मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

1 किलो सोन्याचे बिस्किट पाहून मित्राचे डोळे फिरले आणि मित्रालाच लुटले!

1 किलो सोन्याचे बिस्किट पाहून मित्राचे डोळे फिरले आणि मित्रालाच लुटले!

या कटात सुशांतसोबत असलेला मित्रच सहभागी होता. त्याच्या मित्रानेच एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने ही चोरी घडवून आणली.

या कटात सुशांतसोबत असलेला मित्रच सहभागी होता. त्याच्या मित्रानेच एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने ही चोरी घडवून आणली.

या कटात सुशांतसोबत असलेला मित्रच सहभागी होता. त्याच्या मित्रानेच एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने ही चोरी घडवून आणली.

सांगली, 13 नोव्हेंबर : सोन्याचे बिस्किट (gold biscuit) घेऊन घरी येत असताना चोरांनी कारने धडक देऊन एका तरुणाला लुटल्याची घटना सांगलीत (sangali) घडली होती. पण, पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या मित्राला सोबत नेले होते, त्यानेच घात केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील सुशांत बापुसो वाघमारे या तरुणाला मालक विजय काटकर यांनी त्यांच्याकडील सुमारे 995 ग्रॅम वजनाचे जुने सोनं देऊन सांगोला येथील महाकालीचे दुकानात जाऊन ते गाळून शुद्ध करून त्याचे बिस्कीट करून आणण्याचे सांगितले होते.

सुशांतने खबरदारी म्हणून सोबत आपल्या एका मित्राला घेतले.  दोघे जण मोटरसायकलवरून सांगोला येथे 8 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महाकाली दुकानात जाऊन ते दागिने गाळून त्याचे बिस्कीट तयार करण्यास टाकले. ते तयार झाल्यानंतर सुशांत व त्याचा मित्र सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास परत दुचाकीवरून दिघंचीकडे जाण्यास निघाले. दरम्यान‌, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एकतपुर ते आचकदाणी जाणाऱ्या रोडवर फॉरेस्ट जवळील बागलवाडी शिवारात आले असता त्यांचे पाठीमागून एक अनोळखी चार चाकी गाडी भरधाव वेगात येऊन सुशांतच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

BREAKING : मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार, पोलिसांना निनावी कॉल; यंत्रणा हायअलर्टवर

सुशांत व त्याचा मित्र दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत जाऊन पडले. त्यावेळी धडक दिलेली चार चाकी वाहन ही रोडच्या कडेला चारीत जाऊन पडले. त्यानंतर चारचाकी वाहनातून दोघे जण बाहेर येऊन सुशांतला हाताने व दगडाने मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल फोन काढून घेऊन त्याचे खिशात असलेले सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे बिस्किट जबरदस्तीने काढून घेतले, त्यानंतर वाहन पेटवून देऊन पळून गेले. या सोन्याची किंमत 45 लाख इतकी होती. तसंच, पोलिसांकडे जाऊ नका, अशी धमकीही चोरांनी पोलिसांना दिली.

VIDEO: आलिया-रणबीर राजस्थानमध्ये करणार साखरपुडा? हे खरं की अफवा!

या घटनेनंतर सुशांत वाघमारे याने पोलिसांकडे धाव घेतली आणि  सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अवघ्या 48 तासांत चोरीचा शोध घेवून तीन चोरांच्या मुसक्या आवळल्या. धक्कादायक म्हणजे, या कटात सुशांतसोबत असलेला मित्रच सहभागी होता. त्याच्या मित्रानेच एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने ही चोरी घडवून आणली. या प्रकरणी दीपक प्रकाश जावळेकर (वय 23 वर्षे रा. दिघंची ता. आटपाडी जिल्हा सांगली) अनिल चंद्रकांत भोसले (वय 23 वर्षे प्रकाश नगर गल्ली नंबर 2 अहिल्यानगर महादेव नगर ,मिरज जिल्हा सांगली ) व प्रशांत पाटील ( वय 21 वर्षे ) अशी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Pandharpur