मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'एखादा शूटर लावून मला मारून टाका' जळगावात सेनेच्या आमदाराची थेट खडसेंकडे मागणी

'एखादा शूटर लावून मला मारून टाका' जळगावात सेनेच्या आमदाराची थेट खडसेंकडे मागणी

अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने...

अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने...

'सध्या एकनाथ खडसे यांचं डोकं ठिकाणावर नसून पक्ष बदलल्यानंतर देखील त्यांना अजूनपर्यंत काही मिळाले नाही'

  • Published by:  sachin Salve

मुक्ताईनगर, 01 ऑक्टोबर : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (suhash kande) यांच्यात वाद नुकताच मिटला आहे. पण, आता जळगावमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Shiv Sena MLA Chandrakant Patil ) आणि एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे 'एखादा शूटर लावून मला मारून टाका' अशी मागणीच पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला.

आईला सॅल्युट करून शेवटची ड्युटी बजावली आर.आर.पाटील यांच्या भावाने, फोटो व्हायरल

'खडसे हे आजही मी युती तोडण्याबद्दल अहंकाराने सांगतात, सध्या एकनाथ खडसे यांचा डोकं ठिकाणावर नसून पक्ष बदलल्यानंतर देखील त्यांना अजूनपर्यंत काही मिळाले नाही. त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं तर कधी पळावं लागतं अशी परिस्थिती असताना तीन तीन वेळा कोविड त्यांना होतो. त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती असल्याची मिश्कील टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

'एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये एकनाथ खडसे यांनी लेव्हल सोडल्यास मी देखील लेव्हल सोडून बोलेल. मी खडसे यांचा कधीही अनादर केला नसून बोलताना मात्र एकनाथ खडसे आणि तोंडाला कुलूप लावावे' असंही पाटील म्हणाले.

Royal Enfield ची विक्री 44 टक्क्यांनी घटली; सप्टेंबरमध्ये इतक्याच बुलेटची विक्री

'व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत एकनाथ खडसे हे माझे नाव जोडत असून खडसेंनी ही क्लिप मतदारसंघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावी.  जेणेकरून कोणाची काय पात्रता आहे हे मतदारांना कळेल. मी व माझे कुटुंब अत्यंत साधेपणाने जगतोय. त्यामुळे खडसेंना असं वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे, माझी छोटे कुटुंब असून माझा बाजूने कोणी बोलणारेही नाही , आजही मी रात्री 10 वाजता घराला कुलूप लावून राहतो ही स्थिती आहे' असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

First published:

Tags: Chandrakant patil