मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Royal Enfield बुलेटची विक्री 44 टक्क्यांनी घटली; सप्टेंबर 2021 मध्ये इतक्या बुलेटची देशात विक्री

Royal Enfield बुलेटची विक्री 44 टक्क्यांनी घटली; सप्टेंबर 2021 मध्ये इतक्या बुलेटची देशात विक्री

सेमीकंडक्टर चिपची (Semiconductor Chips Shortage) कमतरता आणखी वाढली आहे. यामुळे वाहन क्षेत्राला (Auto Sector) अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारतीय दुचाकी उत्पादक रॉयल एनफील्डच्या (Royal Enfield Sales) विक्रीवरही परिणाम झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 01 ऑक्टोंबर : कोरोना विषाणूच्या महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरात आधीच निर्माण झालेल्या सेमीकंडक्टर चिपची (Semiconductor Chips Shortage) कमतरता आणखी वाढली आहे. यामुळे वाहन क्षेत्राला (Auto Sector) अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारतीय दुचाकी उत्पादक रॉयल एनफील्डच्या (Royal Enfield Sales) विक्रीवरही परिणाम झाला आहे. सप्टेंबर 2021 दरम्यान रॉयल एनफील्डच्या विक्रीत 44 टक्के घट झाली आहे. कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये फक्त 33,529 बाईक विकल्या आहेत. तर कंपनीने सप्टेंबर 2020 मध्ये 60,331 मोटारसायकलींची विक्री केली होती.

देशांतर्गत विक्री 52 टक्केने कमी, निर्यातीत मात्र वाढ

सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात सेमीकंडक्टर चीपच्या उपलब्धतेमध्ये थोडी सुधारणा झाली आहे. 2022 च्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपासून ऑटो पार्ट्स (Auto Parts) उपलब्ध होणे सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे. रॉयल एनफील्डने सप्टेंबर 2021 मध्ये देशांतर्गत बाजारात 27,233 मोटारसायकलींची विक्री केली. त्याच वेळी सप्टेंबर 2020 दरम्यान देशांतर्गत बाजारात 56,200 युनिट्सची विक्री झाली. सप्टेंबर दरम्यान देशांतर्गत विक्रीत 52 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. त्याच वेळी सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीने 6,296 बाईक्सची निर्यात केली, जी मागील सप्टेंबरमध्ये 4,131 युनिट्स होती. निर्यातीच्या बाबतीत कंपनीने 52 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

हे वाचा - विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे तयार केले अश्लील फोटो, अपलोड केले पॉर्नसाइटवर, नगरमधील धक्कादायक घटना

क्लासिक 350 मध्ये बरेच बदल केले गेले आहेत

स्थानिक ऑटोमेकर रॉयल एनफील्डने अलीकडेच क्लासिक 350 चे नवीन मॉडेल लाँच (New Classic 350 ) केलं आहे. यामध्ये कंपनीनं मागील मोटारसायकलच्या तुलनेत अनेक मोठे बदल केले. कंपनीला पूर्ण अपेक्षा आहे की, या बदलांनंतर या मोटरसायकलची विक्री ऑक्टोबर 2021 मध्ये वेगाने वाढेल.

हे वाचा - कोरोनानंतर आता चीनने आणलं जगावर आणखी एक मोठं संकट; संपूर्ण जगावर मंदीचं सावट!

त्याच वेळी सणासुदीच्या काळात (Festive Season)  नवीन क्लासिक 350 च्या मागणीत झपाट्याने वाढ अपेक्षित आहे.

First published:

Tags: Bikers pride, Royal enfield 350