जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तुमच्या मुलीला भरपूर दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे महिनाभर ठेवा' युट्यूबर डॉक्टरचा अजब उपचार, गुन्हा दाखल

'तुमच्या मुलीला भरपूर दारू पाजा आणि बायफ्रेंडकडे महिनाभर ठेवा' युट्यूबर डॉक्टरचा अजब उपचार, गुन्हा दाखल

 मानसोपचार तज्ञ डॉक्टरने (Fake psychiatrist) एका स्त्री रुग्णावर उपचार करण्यासाठी 5 व्हिस्की आणि 10 बिअर असा मद्य व शरीर संबंध ठेवण्याचा उपचार सांगितला.

मानसोपचार तज्ञ डॉक्टरने (Fake psychiatrist) एका स्त्री रुग्णावर उपचार करण्यासाठी 5 व्हिस्की आणि 10 बिअर असा मद्य व शरीर संबंध ठेवण्याचा उपचार सांगितला.

मानसोपचार तज्ञ डॉक्टरने (Fake psychiatrist) एका स्त्री रुग्णावर उपचार करण्यासाठी 5 व्हिस्की आणि 10 बिअर असा मद्य व शरीर संबंध ठेवण्याचा उपचार सांगितला.

  • -MIN READ
  • Last Updated :

विरार, 22 सप्टेंबर : विरारमध्ये (virar) अमेरिकेची ऑनलाइन पदवी घेतलेल्या बनावट मानसोपचार तज्ञ डॉक्टरने (Fake psychiatrist) एका स्त्री रुग्णावर उपचार करण्यासाठी 5 व्हिस्की आणि 10 बिअर असा मद्य व शरीर संबंध ठेवण्याचा उपचार सांगितला. या उपचार काहीतरी गौडबंगाल असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावेळी या कुटुंबीयांना डॉक्टरने 9 लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्नाळा पोलिसांनी या डॉक्टरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अर्नाळा पोलिसांनी माहिती दिली की, हैद्राबाद येथे राहणारे किरण कुमार वंगला (47) (kiran kumar vangala) हे एका महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांची मुलगी (स्किझोफ्रेनिया) या आजाराने ग्रासली आहे. तिच्यावर हैद्राबाद येथे एका तज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत. पण तिला गुण येत नव्हता. दरम्यान वंगला यांच्या पत्नीने युट्यूबवर (youtube) विरार येथील डॉ. कैलाश मंत्री (kailsh mantri) याचे व्हिडीओ पहिले त्यात त्यांनी ऑनलाइन पद्धतीने हा आजार 10 दिवसात बरे करण्याचा दावा केला होता. त्याच्या या प्रलोभनाला बळी पडून वंगला यांच्या पत्नीने मंत्री याच्याशी संपर्क साधला. धक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती यावेळी मंत्री यांनी उपचाराचे ५ लाख रुपये सांगितले आणि मुली बरोबर घरच्या मंडळीचा सुद्धा उपचार करवा लागेल असं त्याने सांगितलं. सांगितल्यानुसार वंगला कुटुंबीयांनी मंत्री याला पैसे पाठविले आणि त्याने सांगितल्या पद्धतीने उपचार घेतले. पण वंगला यांच्या मुलीत कोणतीही सुधारणा झाली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा मंत्री याच्याशी संपर्क साधला आणि मुलीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे सांगितलं. यावेळी मंत्री याने त्यांना मुंबईला येवून भेटण्यास सांगितलं. अजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द झाल्याचं ‘महाराष्ट्र कनेक्शन’ मंत्री याने वंगला यांना विमानतळावर घेण्यासाठी गाडी पाठवली, यावेळी त्याने उपचारासाठी 5 विस्की आणि 10 बिअर बॉटल्स आणि ३ लाख रुपये घेवून येण्यासाठी सांगितले, वंगला यांनी पुन्हा पैसे आणि दारू दिली. जेव्हा ते डॉक्टर मंत्री याला विरार येथील बोळींज परिसरातील दवाखान्यात भेटले तेव्हा त्याने अजब उपचार सांगितले त्याने सागितले की, ‘तुमच्या मुलीला भरपूर दारू पाजा आणि तिला महिनाभर एका प्रियकराच्या जवळ ठेवा. वंगला यांना हे उपचार पटले नाही आणि त्यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात तक्रार नोंदविली. अर्नाळा पोलिसांनी डॉक्टर कैलाश मंत्री याची चौकशी केली असता त्याने ऑनलाईन पद्धतीने अमेरिकेतील एका विद्यापीठातून मानसउपचार तज्ञाची पदवी घेल्याचे आढळून आले. ही पदवी बनावट असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे याच्या पदवीची तपासणी पोलीस करत आहेत. सध्या त्याच्या विरोधात 9 लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्याची माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात