शिर्डी, 28 मे: अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 99 वर जावून पोहोचला आहे. पुणे, मुंबईतून गावाकडे येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शिर्डी शेजारच्या निमगाव येथील भाजी विक्रेती महिला कोरोनाबाधित झाल्याने आख्ख गाव आता पुढील चौदा दिवसांसाठी सील करण्यात आलं आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह 29 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सगळ्या रुग्णाचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आता अहवाल नेमका काय येतो, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. हेही वाचा… नगरसेविका पुत्रासह 12 प्रतिष्ठीतांना रंगेहात पकडलं, करत होते बेकायदा कृत्य लपून गावी गेल्यानंतर सापडले 3 पॉझिटिव्ह.. घाटकोपर इथून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई इथं परतलेल्या 4 नागरिकांपैकी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या नागरिकांना गावी सोडणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील साकोरे इथल्या जावयालाही लागण झाली असल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, दक्षता घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी केलं आहे. मुंबई (घाटकोपर) इथून दोन लहान नातींना घेऊन आजी आजोबा रात्री आंबेगावमधील साकोरे इथल्या जावयाच्या गाडीत बसून कवठे येमाई गावात आले. त्यांना कवठे येमाई इथं सोडून हा जावई पसार झाला. या आजी आजोबांचा मुलगा हा मुंबई इथं चालक असून त्याला कोरोनोची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही चाचणीसाठी आरोग्य विभागानं मुंबईतच ताब्यात घेतलं. हेही वाचा.. गावाबाहेर करण्यात आलं जवानाच्या पत्नीला क्वारंटाइन, केलं असं काम की… घरात राहणारी मुली व आजी आजोबा रात्रीत जावयाला सोबत घेऊन मुळ गाव असलेल्या कवठे येमाई इथं आले. याबाबतची बातमी समजताच जागृत ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी त्यांना क्वांरंटाईन केलं. मात्र, नंतर संशय आल्यानं औंध इथं जिल्हा रुग्णालयात रविवारी पाठवण्यात आलं. त्या चौघापैकी आजी आजोबा व एका मुलीचा चाचणी अहवाल पॉढिटिव्ह आला आहे. तसंच जावई सुद्धा पॉझिटिव्ह आला आहेत. यामुळे कवठे येमाई परीसरात गावकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावण निर्माण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.