गावाबाहेर करण्यात आलं जवानाच्या पत्नीला क्वारंटाइन, केलं असं काम की...

गावाबाहेर करण्यात आलं जवानाच्या पत्नीला क्वारंटाइन, केलं असं काम की...

प्राथमिक शाळेत क्वारंटानमध्ये राहायचं हा अनुभव खूपच त्रासदायक असाच असतो. इथं सुविधांंपेक्षा असुविधांचीच गर्दी जादा असते.

  • Share this:

कोल्हापूर, 28 मे : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. मुंबई-पुण्यातून गावी गेलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. पण, क्वारंटाउन सेंटरमध्ये राहुन एका तरुणीने शाळेचं रुप बदलून टाकलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील निढोरी गावची रहिवासी असलेली शामल दिग्विजय चौगले या नवविवाहितेला प्राथमिक शाळेत क्वारंटाइन करण्यात  आले. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळेकडे माणसं यायला घाबरत आहे. अशा वातावरणात शामल शाळेची बाग स्वच्छ करत होती. हे दृश्य समाजाच्या दृष्टीने समाधान देणारे आणि नवयुवकांना दिशादर्शक असंच आहे. शामल यांचे पती दिग्विजय चौगले हे भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत आहेत. आणि शामल पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. कोरोनाबाधित क्षेत्रातून आल्याने त्यांना प्राथमिक शाळेमध्ये विलगीकरणात राहावं लागत आहे.

हेही वाचा -राशीभविष्य: वृषभ आणि धनु राशीच्या व्यक्तींना प्रेमात मिळू शकते निराशा

या ही परिस्थितीत त्या अभ्यासात मग्न आहेत. प्रशासकीय अधिकारी बनायचं असेल तर कष्ट घ्यायची तयारी लागते धीर सोडून चालत नाही. मनानं खंबीर असावं लागतं. जे नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा खुबीने वापर करण्याची क्षमता अंगी बाळवावी लागते हेच शामल यांनी मनाशी पक्क केलं होतं.

हेही वाचा - मोठी बातमी! माजी महापौराला अटक, खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

 

प्राथमिक शाळेत विलगीकरणामध्ये राहायचं हा अनुभव खूपच त्रासदायक असाच असतो. इथं सुविधांंपेक्षा असुविधांचीच गर्दी जादा असते आणि मग तिथं वास्तव्याला आलेला प्रत्येक जीव  क्वारंटाइन कालावधी संपण्यासाठी एक एक दिवस मोजत असतो आणि इथं एकट्याने राहायचं असेल तर मग विचारच न केलेला बरा. तरीही शामल यांनी या शाळेत एकटं राहण्याचा निर्णय घेतला आणि शाळेतील संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्यांच्या कामामुळे गावातील लोकांनी कौतुक केलं आहे.

 

First published: May 28, 2020, 10:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading