नितीन नांदूरकर, प्रतिनिधी
जळगाव, 31 मार्च : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत अंगावर कोसळून एका 13 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नशिराबाद गावात ही घटना घडली आहे. नशिराबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संरक्षण भिंत पडल्याने एक 13 वर्षीय मुलगा सापडला. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा., खालची अळी) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
मोहित हा आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत नशिराबादमध्ये वास्तव्याला होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. सध्या परीक्षेच्या नंतर सुट्ट्या असल्या कारणामुळे तो घरी होता. मित्रांसोबत सुनसगाव रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खेळत होता. खेळता-खेळता अचानक शाळेची संरक्षण भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्याची उपचारादरम्यान त्याचा प्राणज्योत मालविली.
(ते दोघे हरियाणातून मुंबईत कांड करण्यासाठी येत होते, पण वाटेत नाशिकच्या CEO ची दिसली गाडी आणि...)
मुलाचा मृत्यू झाल्याने आईवडीलांना हंबरडा फोडला होता. मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन आणि ठेकेदार याच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेड यांनी केला होता. मयताच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई असा परिवार आहे. तर वडील नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला आहेत.
(लग्नदिवशीच वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 3 ठार तर 12 गंभीर)
या प्रकरणी संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणारा ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केले आहे. या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.