लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 31 मार्च : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडी चोरण्याच्या उद्देशाने नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कंपनीत CEO पदावर असलेल्या योगेश मोगरे यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घटनेतील एका अल्पवयीन संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड MIDC मधील रोहिणी इंडस्ट्रीजचे CEO योगेश मोगरे यांचा खून झाला होता.
मोगरे हे पांडवलेणी परिसारत सर्व्हिस रोड येथे असलेल्या आंगण हॉटेलच्या बाहेर टपरीवर उभे असताना ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पांडवलेणीकडून दोन व्यक्ती चालत येत मोगरे यांचे चारचाकी वाहन चोरण्याच्या उद्देशाने चावी घेण्याचा प्रयत्न केला.
(लग्नदिवशीच वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 3 ठार तर 12 गंभीर)
मात्र मोगरे यांनी त्यास विरोध केल्याने या संशयितांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने वार केले. त्यांनतर दोघे संशयित हे मोगरे यांची कार घेऊन पसार झाले होते. त्यांनतर पोलिसांना ही कार बेळगाव कुर्हे येथे आढळून आली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांनतर गुन्हे शाखेचे एकूण 6 पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली होती. साक्षीदार,CCTV आणि काही भौतिक पुराव्यांच्या आधारे गुन्हे शोध पथकाने हरियाणा येथून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याकडे चौकशी केली असता अल्पवयीन संशयित आणि त्याचा आणखी एक साथीदार हे हरियाणा येथून मुंबई येथे किडनॅपिंगच्या इराद्याने आले होते.
त्यांनतर त्यांना एका कारची आवश्यकता होती. त्यासाठी हे दोघे संशयित मुंबई येथून नाशिकला आले आणि त्यांनी मोगरे यांना गाठून त्यांची कार चोरण्याच्या उद्देशाने चावी घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र योगेश मोगरे यांनी प्रतिकार केल्याने या दोघा संशयितांनी मोगरे यांच्यावर चाकूने प्राण घातक हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेतील आणखी एक हरियाणा येथील संशयित आरोपी अजितसिंग सत्यवान लठवाल याचा पोलीस शोध घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.