मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नदिवशीच वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 3 ठार तर 12 गंभीर

लग्नदिवशीच वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 3 ठार तर 12 गंभीर

 छत्तीसगडच्या नरटोराजवळ NH-53 वर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पिकअपची जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात झाला.

छत्तीसगडच्या नरटोराजवळ NH-53 वर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पिकअपची जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात झाला.

छत्तीसगडच्या नरटोराजवळ NH-53 वर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पिकअपची जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात झाला.

  • Local18
  • Last Updated :
  • Chhattisgarh, India

रामकुमार नायक (महासमुंद), 29 मार्च : छत्तीसगडच्या नरटोराजवळ NH-53 वर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पिकअपची जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की यामुळे एकच खळबळ उडाली होती. लग्नाचे वऱ्हाड परतत असताना हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातात 3 जागीच ठार झाले आहेत तर 12 जण गंभीर जखमी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 9.30 वाजता ही घटना घडल्याचे बोलले. पोलीस अधिकारी प्रेमलाल साहू म्हणाले की, पिकअप आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत तीन जण ठार झाले. दोन मुलांसह सहा जण गंभीर जखमी असल्याचे बोलले जात आहे.

ऑनलाईन टॉवेल ऑर्डर करताच महिलेच्या अकाऊंटमधून 8 लाख गायब; तुम्ही 'ही' चूक करत नाही ना?

यासोबतच 22 जखमी झाल्याची माहिती आहे. झालप भागातील तेलीबांध येथील दोन आणि रामपूर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान घटना झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

रामपूरमधील पुरुष, महिला आणि लहान मुलांसह 31 जण एका मालवाहू पिकअपमधून लग्नातून परतत होते. दरम्यान, नरतोराजवळ दोन वाहनांमध्ये ही टक्कर झाली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात अनेकदा लोक स्वस्त प्रवासासाठी माल वाहतुक करणाऱ्या वाहनांमधून प्रवास करत असतात.

मला IPS व्हायचं होतं, ताईला घेऊन जा मी चालले, 13 वर्षांच्या मुलीने संपवलं आयुष्य, बीड हळहळलं

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मंगळवारी रात्री ही घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण नरतोरा मोड जिल्ह्यातील १३ ब्लॅक स्पॉटपैकी एक आहे. हा अपघात प्रवण क्षेत्र असुनही वाहने बेशिस्तपणे चालवत असल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

First published:
top videos

    Tags: Chattisgarh, Local18, Major accident