• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • आंदोलनापूर्वीच महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना राजधानी दिल्लीत केलं स्थानबद्ध

आंदोलनापूर्वीच महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना राजधानी दिल्लीत केलं स्थानबद्ध

संसदेने पारित केलेल्या शेती सुधारणा कायद्याविरोधात शेतकरी संघटनांकडून दिल्ली घेराव आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: संसदेने पारित केलेल्या शेती सुधारणा कायद्याविरोधात शेतकरी संघटनांकडून दिल्ली घेराव आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आंदोलनात 500 हून अधिक शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. परंतु, आंदोलनापूर्वीच महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनासह शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. मजनूका टिला येथील गुरुद्वारातून राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक संदीप आबा गिड्डे-पाटील तसेच राष्ट्रीय किसान महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर यांना गुरुवारी ताब्यात घेण्यात आलं. त्यांना सराय काले खॉं परिसरात स्थानबद्ध ठेवण्यात आले आहे. हेही वाचा...महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दुफळी? बाळासाहेब थोरातांनी टोचले अशोक चव्हाणांचे कान संदीप आबा गिड्डे-पाटील आणि शंकर दरेकर यांनी शुक्रवारी न्यायदंडाधिकार्यांसमक्ष हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणा तसेच पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन पेटले आहे. असंख्य शेतकर्यांनी बुधवारपासूनच राजधानीच्या दिशेने कुच केली आहे. दिल्लीच्या सीमेवर त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा मोर्चा अडवण्यात आले आहे. आंदोलन चिघळून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये त्यामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांची त्यामुळे धरपकड सुरु आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान क्रांती, बळीराजा शेतकरी संघटना या संघटना राष्ट्रीय किसान मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, जळगाव येथील चारशे शेतकऱ्यांचा जत्था सचखंड एक्सप्रेसनं बुधवारीच दिल्लीत दाखल झाला आहे. या शेतकऱ्यांची राहण्याची व्यवस्था मजनू का टीला गुरूद्वारा, काश्मीरी गेट येथे करण्यात आली आहे.पंरतू, दिल्ली पोलिसांनी सकाळीच सर्व शेतकरी आंदोलकांना गुरूद्वारात स्थानबद्ध केले.शेतकर्यांच्या भेटीसाठी गेले असताना पोलिसांनी शेतकरी नेत्यांनाही ताब्यात घेतले. नवीन शेतकरी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून बनवण्यात आले असून यामुळे देशभरातील अन्नदाता शेतकरी देशोधडीला लागणार आहे. हेही वाचा...संजय राऊतच मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात, चंद्रकांत पाटलांचा घणाघात देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असल्यामुळेच जागतिक मंदी तसेच कोरोना यासारख्या जागतिक संकटांनी देखील भारताची अर्थव्यवस्था तरली आहे. परंतु, मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या पायावर कुर्‍हाड मारल्यामुळे देशातील शेतकरी नष्ट होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी, शेती आधारित उद्योग व अर्थव्यवस्थेवरदेखील दुरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत संघर्ष सुरुच ठेवू,अशी भावना गिड्डे-पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.
Published by:Sandip Parolekar
First published: