Home /News /viral /

भाजप खासदाराचा प्रताप, मध्यरात्री सलून उघडायला लावले आणि केली कटिंग, पाहा हा LIVE VIDEO

भाजप खासदाराचा प्रताप, मध्यरात्री सलून उघडायला लावले आणि केली कटिंग, पाहा हा LIVE VIDEO

फक्त केस कापण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास लॉकडाउन नियम धाब्यावर बसून सलूनचे दुकान उघडायला लावले.

    प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी भंडारा, 08 ऑगस्ट : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. पण, भाजपच्या खासदाराने सर्वच नियम पायदळी तुडवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. फक्त कटिंग करण्यासाठी खासदार महोदयांनी रात्री एकट्यासाठी दुकान उघडे ठेवले होते. लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार वारंवार लोकांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्यासाठी सूचना देत आहे. लोकांची गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठांना ठराविक दिवस आणि वेळ ठरवून दिली आहे. याच वेळेत दुकानं उघडी ठेवणे बंधनकारक आहे. पण, भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार आणि नगराध्यक्ष सुनील मेंढे हे यासाठी अपवाद ठरले आहे. सुनील मेंढे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फक्त केस कापण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास लॉकडाउन नियम धाब्यावर बसून सलूनचे दुकान उघडे ठेवून कटिंग करत असल्याचे समोर आले आहे. रात्री 11 नंतर भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील लुक्स सलूनचे शटर उघडे दिसले तसेच खासदार सुनील मेंढे यांची गाडी आणि त्यांचा गार्ड हे दुकानाबाहेर दिसले.  त्यामुळे तिथून जाणाऱ्या नागरिकांनी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता गार्डने त्यांना थांबविले. तेव्हा व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांनी त्या गार्ड लाच प्रश्न विचारून भांबावून टाकले की, रात्री अकरानंतर कुठल्या कायद्यात दुकान सुरू आहे.   असं विचारतात गार्डने मला विचारू नका साहेबांना विचारा असं सांगत तोंड वळविले. कुणीतरी आपला व्हिडिओ काढत आहे असं सुनील मेंढे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः लपविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हिडिओ काढणे बंद आहे, असं लक्षात येताच झपाट्याने दुकानाबाहेर पळत गाडीत बसून तिथून पळ काढला. या सर्व प्रकाराने  चिडलेल्या संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत खासदार सुनील मेंढे आणि दुकानदार याच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. नगराध्यक्ष हा शहराचा प्रमुख व्यक्ती असतो जर प्रमुख व्यक्ती तशा पद्धतीने मुद्दाम केंद्राच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल तर अशा व्यक्तींवर नक्कीच कारवाई केली जावी तसेच नैतिकतेच्या आधारावर या नगराध्यक्ष आणि त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या