मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

12 दिवसात 9 लाख मजुरांनी महाराष्ट्रातून घेतला काढता पाय, राज्याला 82 हजार कोटींचा फटका!

12 दिवसात 9 लाख मजुरांनी महाराष्ट्रातून घेतला काढता पाय, राज्याला 82 हजार कोटींचा फटका!

एप्रिलच्या सुरुवातीच्या 12 दिवसांमध्येच महाराष्ट्रातून तब्बल 9 लाख मजुरांनी (Migrant Workers)  काढता पाय घेत आपल्या राज्याच्या वाटा धरल्या आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की आता व्यापारी किंवा मालकदेखील या लोकांना थांबवण्यास इच्छुक नाहीत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 26 एप्रिल : कोरोनाचा (Coronavirus) प्रसार झपाट्यानं वाढू लागताच पुन्हा एकदा मजूरांनी मोठ्या प्रमाणात पलायन करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय स्टेट बँकेनं (SBI) केलेल्या रिसर्चनुसार, एप्रिलच्या सुरुवातीच्या 12 दिवसांमध्येच महाराष्ट्रातून तब्बल 9 लाख मजुरांनी (Migrant Workers) काढता पाय घेत आपल्या राज्याच्या वाटा धरल्या आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की आता व्यापारी किंवा मालकदेखील या लोकांना थांबवण्यास इच्छुक नाहीत.

एसबीआयच्या रिपोर्टनुसार, 1 ते 12 एप्रिलदरम्यान वेस्टर्न रेल्वेच्या 196 गाड्यांमधून 4.32 लाख लोकांनी प्रवास केला आहे. यातील 150 रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या आहेत. यात 3.23 लाख लोक पुन्हा आपल्या राज्यात परतले आहेत. इतकंच नाही तर यादरम्यान मध्य रेल्वेकडून चालवण्यात आलेल्या 336 ट्रेनमधून 4.70 लाख प्रवाशांनी महाराष्ट्रातून आपल्या राज्यात प्रवास केला आहे. या रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारसह आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांसाठी होत्या.

रिपोर्टनुसार, , लॉकडाऊनचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उपक्रम राबविणार्‍या महाराष्ट्रावर गंभीर परिणाम होतील. सध्याच्या कडक निर्बंधांमुळे राज्याला 82 हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागू शकतं. येणाऱ्या दिवसात नियम आणखी वाढल्यास स्थितीदेखील अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Coronavirus: देशात अचानक का वाढला कोरोनाचा प्रसार, CSIR नं केला मोठा खुलासा

सध्याची कोलमडलेली आरोग्य व्यवस्था पाहाता व्यापारीदेखील कामगारांना थांबविण्यास मागेपुढे पाहात आहेत. इंडिया एसएमई फोरमच्या महासंचालक सुषमा मोर्थानिया यांनी सांगितलं, की रुग्णालयात बेडची कमतरता ही एक मोठी समस्या बनत आहे. अशा परिस्थितीत मजूर रोखणे आणि उद्रेक झाल्यास त्यांच्या उपचाराच्या अडचणींना सामोरे जाणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यापारी अत्यंत गरजेचं काम असल्यासच कामगारांना थांबवत आहेत. तेदेखील केवळ अशाच लोकांना थांबवत आहेत ज्यांचा इनश्यूरन्स केला गेला आहे.

अजीम प्रेमजी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अमिल बसोले यांच्या म्हणण्यानुसार, शेवटच्या लॉकडाऊनदरम्यान कामगारांच्या पलायनादरम्यान त्यांची आर्थिक परिस्थिती बरीच खालावली होती. आता बऱ्याच दिवसानंतर हे काम त्यांनी पुन्हा सुरू केले होते. मात्र काम आता पुन्हा थांबले आहे. अशात कामगारांना पुन्हा शहराकडे येणं कठीण होईल.

First published:

Tags: Corona updates, Lockdown, Mumbai, Worker