Home /News /coronavirus-latest-news /

Coronavirus: देशात अचानक का वाढला कोरोनाचा प्रसार, CSIR नं केला मोठा खुलासा

Coronavirus: देशात अचानक का वाढला कोरोनाचा प्रसार, CSIR नं केला मोठा खुलासा

सीएसआयआरनं आपल्या वीस लॅबोरेटरीच्या मदतीनं 10,427 लोकांवर सिरो सर्व्हे केला होता. 10,427 लोकांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पॉझिटिव्हीटी रेट 10.14 टक्के होता.

    नवी दिल्ली 26 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असल्याचं चित्र आहे. याचदरम्यान काउन्सिल फॉर साइन्टिफीक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) च्या सर्व्हेमधून कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या कारणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सर्व्हेमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाट आलेली असतानाही लोकं आजारी पडण्यामागे एक कारण हेदेखील असू शकतं, की सिरो सर्वेक्षणात पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये कोणतीही विशिष्ट अँटी बॉडी अस्तित्वात नसेल, ज्यामुळे ते संसर्गासोबत लढा देतील. सीएसआयआरनं आपल्या वीस लॅबोरेटरीच्या मदतीनं 10,427 लोकांवर सिरो सर्व्हे केला होता. यात कॉन्ट्रॅक्टवर असणारे कर्माचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी होते. हे लोक केंद्रशासित प्रदेशांसह 17 राज्यांमधील निवासी आहेत. 10,427 लोकांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पॉझिटिव्हीटी रेट 10.14 टक्के होता. सर्व्हेच्या मुख्य लेखकांपैकी एक असलेल्या शांतनू गुप्ता यांनी सांगितलं, की मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये अँटीबॉडीजच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याच कारणामुळे लोकं अधिक प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळत होती. मात्र, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट येण्यास सुरुवात झाली होती. सर्व्हेनुसार, पाच ते सहा महिन्यांनंतर सिरो पॉझिटिव्ह लोकांमध्ये महत्त्वपूर्ण न्यूट्रीलायझेशन अॅक्टिव्हिटीची कमी दिसली. CSIR च्या डेटामध्ये अशी माहिती मिळाली, की अँटी-एनसी (न्यूक्लियोकॅप्सिड) अँटीबॉडी वायरल आणि इन्फेक्शनविरोधात दीर्घ काळासाठी सुरक्षा प्रदान करते. आपण आणखी कडक निर्बंध लादल्यास शरिरात न्यूट्रीलायझेशनलची मोठी कमी जाणवू शकते. याच कारणामुळे कोरोनाची दुसरी लाट अधिक झपाट्यानं पसरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या अभ्यासात सिरो पॉझिटिव्हिटी रेट 10.14 टक्के येण्याचा अर्थ असा होतो, की भारतात अनेक ठिकाणी सप्टेंबर 2020 मध्ये लोकं कोरोनातून बरे झाले होते. विशेषतः ते लोक जे लोकांच्या संपर्कात अधिक येतात आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. याच कारणामुळे ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी झाली होती. या काळात लोकांच्या शरिरात प्रतिकारशक्ती तयार झाली होती, मात्र ही रोगप्रतिकारशक्ती इतकीही नव्हती की भविष्यातही कोरोनाचा संसर्ग रोखू शकेल. महाराष्ट्रात मार्चनंतर कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अभ्यासात असं म्हटलं गेलं आहे, की या सर्वेक्षणात 24 शहरांमधील लोक सहभागी होते आणि यातून मार्च 2021 च्या आधी देशात पसरलेल्या कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. यात असंही समोर आलं आहे की सप्टेंबर २०२० पर्यंत भारतातील बहुतेक लोकं कोरोनातून बरे झाले होते आणि त्यांच्यात रोगप्रतिकारशक्तीही तयार झाली होती. हा अभ्यास जूनमध्ये केला गेला होता. यानंतर देशात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होऊ लागलं होतं. सोबतच रुग्णसंख्याही कमी होत होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या