मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ज्या सराफाकडे गहाणं ठेवलं होतं सोनं, त्याच्यावरच गोळीबार करून लुटले, वाशिममधील घटनेचं गूढ उकललं

ज्या सराफाकडे गहाणं ठेवलं होतं सोनं, त्याच्यावरच गोळीबार करून लुटले, वाशिममधील घटनेचं गूढ उकललं

 पोल्ट्री फॉर्मसाठी 12 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

पोल्ट्री फॉर्मसाठी 12 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

पोल्ट्री फॉर्मसाठी 12 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

किशोर गोमाशे, प्रतिनिधी

वाशिम, 25 डिसेंबर : वाशिम (washim) जिल्ह्यातील मालेगाव (malegaon) शहरात एका ज्वेलर्स (jewelers) मालकावर गोळीबार करून लुटण्यात आले होते. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी वेगवान तपास करत अखेर हल्लेखोरांना जेरबंद केले आहे. पोल्ट्री फॉर्मसाठी 12 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबरला मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर व त्यांचे सहकारी कामगार रवींद्र वाळेकर हे 21 डिसेंबरच्या रात्री दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्याकडील बॅग लंपास करण्यासाठी गाडी अडवून योगेश अंजनकर आणि रवींद्र वाळेकर यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.  त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले व देशी कट्टा मधून गोळीबार केला. यामध्ये योगेश अंजनकर आणि वाळेकर हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या दरोडेखोरांनी 9 लाख 9 हजार रुपये व 53 ग्राम सोने असलेली बॅग लंपास केली होती. या सशस्त्र हल्ल्यात कामगार रवींद्र वाळेकर यांचा मृत्यू झाला असून सोने व्यापारी योगेश अंजनकर जखमी असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लग्नानंतर माहेरी आलेल्या तरुणीला घातलं कोंडून, कारण वाचून बसेल धक्का

या घटनेमुळे मालेगांव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या सशस्त्र लुटी प्रकरणी पोलिसांनी सुकांडा येथील अजाबराव घुगे या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन गावठी कट्टे,2 लाख 40 हजार रुपये किमतीचं 53 ग्राम सोनं असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अजाबराव घुगे या आरोपीवर पोल्ट्री फार्म चे 12 लाख कर्ज झाले होते. त्यासाठी त्याने अंजनकर ज्वेलर्स यांच्याकडे स्वतः कडील सोने ही गहाण ठेवलं होतं. पोल्ट्री करीता अजाबराव घुगे याला पैशांची गरज असल्याने तो अंजनकर यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामधून या दोघांचे आपसी मतभेद झाले होते. त्यामुले आरोपी घुगे याने आपल्या साथीदारांसह सशस्त्र लुटीचा कट रचला.

घटस्फोटाची अशी अट की पतीला राहावं लागेल 8000 वर्षं कैदेत, वाचा सविस्तर

या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी मालेगाव शहर ही बंद ठेवले होते. या लुटीच्या घटनेचे पडसाद विधानसभेत ही उमटले आहेत. रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांनी या लुटीच्या घटनेतील आरोपीना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. आज यातील एक आरोपी अटक झाला असून इतर आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

First published:
top videos

    Tags: WASHIM NEWS