मराठी बातम्या /बातम्या /विदेश /घटस्फोटाची अशी अट की पतीला राहावं लागेल 8000 वर्षं कैदेत, वाचा सविस्तर

घटस्फोटाची अशी अट की पतीला राहावं लागेल 8000 वर्षं कैदेत, वाचा सविस्तर

कुठल्याही गुन्ह्यात जास्तीत जास्त किती कैद होऊ शकते? 50 वर्षे? 60 वर्षं? 100 वर्षं? इस्त्रायलमध्ये एका व्यक्तीला कोर्टानं तब्बल 8000 वर्षांची कैद सुनावली आहे.

कुठल्याही गुन्ह्यात जास्तीत जास्त किती कैद होऊ शकते? 50 वर्षे? 60 वर्षं? 100 वर्षं? इस्त्रायलमध्ये एका व्यक्तीला कोर्टानं तब्बल 8000 वर्षांची कैद सुनावली आहे.

कुठल्याही गुन्ह्यात जास्तीत जास्त किती कैद होऊ शकते? 50 वर्षे? 60 वर्षं? 100 वर्षं? इस्त्रायलमध्ये एका व्यक्तीला कोर्टानं तब्बल 8000 वर्षांची कैद सुनावली आहे.

तेल अवीव, 24 डिसेंबर: एका पतीला (Husband) आपल्या पत्नीनं (Wife) केलेली घटस्फोटाची केस (Divorce Case) इतकी महाग पडली आहे की त्याला कोर्टानं थेट 8000 वर्षांची शिक्षा (8000 years punishment) सुनावली आहे. ही शिक्षा ऐकून जगभरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला कुठल्याही गुन्ह्यात मिळणारी जास्तीत जास्त कैद किती असू शकते, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. माणसाचं आयुष्य किती असतं आणि त्याला मिळणारी शिक्षा किती असावी, याच्या प्रमाणाचा विचार केला जाणार की नाही, असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित झाला आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण आहे एका ऑस्ट्रेलियातील नागरिकाचं. नॉर्म हुपर्ट नावाचा ऑस्ट्रेलियातील नागरिक 2012 साली आपल्या मुलांसह इस्त्रायलमध्ये आला होता. त्यानं इस्त्रायलमध्येच काही वर्षं राहण्याचा निर्णय़ घेतला आणि तिथं घरही घेतलं. मात्र काही वर्षांतच त्याच्या पत्नीनं घटस्फोटाची केस दाखल केली. प्रत्येक देशात घटस्फोटाचे कायदे वेगवेगळे असतात. मात्र इस्त्रायलमधील कायदे ही महिलांना पूर्ण देण्याच्या दृष्टीने अत्यंत कडक स्वरुपाचे बनवण्यात आले आहेत. त्यानुसार इस्त्रायलच्या न्यायालयाने नॉर्मला अशी शिक्षा सुनावली की अनेकांचा त्यावर विश्वासच बसला नाही.

काय आहे शिक्षा?

इस्त्रायलच्या कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेनुसार नॉर्मला 31 डिसेंबर 9999 पर्यंत देश सोडून बाहेर पडता येणार नाही. म्हणजेच कोर्टानं त्याला 8000 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा टाळायची असेल तर त्याच्यापुढे एकच पर्याय ठेवण्यात आला आहे. त्यासाठी त्याला 30 लाख डॉलर भरावे लागणार आहेत. म्हणजेच भारतीय चलनात विचार केला, तर त्याला 47 कोटी रुपये भरावे लागतील. ही रक्कम जर त्याने भरली नाही, तर त्याला पुढची 8000 वर्षं इस्त्रायलमध्येच राहावं लागणार आहे.

हे वाचा - मुनगंटीवारांना लगेच पहाट आठवते, अजित पवारांच्या टोलेबाजीने सभागृहात एकच हश्या

अजब शिक्षा

ही शिक्षा मानवाधिकारांचं उल्लंघन करणारी असल्याचं अनेकांचं मत आहे. या शिक्षेत तो पर्यटन किंवा इतर कुठल्याच कारणासाठी देश सोडू शकत नसल्याची अट घालण्यात आली आहे.

First published:

Tags: Australia, Divorce, Israel