मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नानंतर माहेरी आलेल्या तरुणीला घातलं कोंडून, कारण वाचून बसेल धक्का

लग्नानंतर माहेरी आलेल्या तरुणीला घातलं कोंडून, कारण वाचून बसेल धक्का

लग्न झाल्यावर मुलीच्या नातेवाईकांना अशी एक गोष्ट समजली ज्यामुळे त्यांनी झालेलं लग्न मोडून तरुणीला कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला.

लग्न झाल्यावर मुलीच्या नातेवाईकांना अशी एक गोष्ट समजली ज्यामुळे त्यांनी झालेलं लग्न मोडून तरुणीला कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला.

लग्न झाल्यावर मुलीच्या नातेवाईकांना अशी एक गोष्ट समजली ज्यामुळे त्यांनी झालेलं लग्न मोडून तरुणीला कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला.

नालंदा, 24 डिसेंबर: दोघांचं साग्रसंगीत लग्न (Marriage) झाल्यावर काही दिवसांनी जेव्हा तरुणी माहेरी (home) गेली, तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला कोंडून ठेवलं (Locked) आणि सासरी पाठवायला नकार (Denied to let her go) दिला. आजही जातीच्या (Caste) भिंती किती खोलवर रुतलेल्या आहेत, याची प्रचिती देणारी ही घटना. प्रेमविवाहात जात आडवी येऊ नये, यासाठी तरुणाने ती लपवून ठेवली. मात्र जात वेगळी असल्याचं लक्षात आल्यावर झालेलं लग्नही मोडून मुलीच्या घरच्यांनी तिला कोंडून ठेवलं.

अशी घडली घटना

बिहारच्या नालंदामध्ये राहणाऱ्या पवन कुमार नावाच्या तरुणाचं निशा कुमारी नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं. 19 डिसेंबर रोजी दोन्हीकडच्या नातेवाईकांनी एकत्र येत धुमधडाक्यात दोघांचं लग्न लावलं होतं. दोघांचंही एकमेकांवर आधीपासूनच प्रेम होतं. या प्रेमप्रकरणाचं लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आणि त्याला घरच्यांनी पाठिंबा दिला. मात्र हे करताना तरुणानं त्याची खरी जात लपवून ठेवली, असा दावा तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे.

तरुणीला घातलं कोंडून

जेव्हा लग्नानंतर निशा कुमारी घरी आली, तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला कोंडून घातलं आणि परत सासरी पाठवण्यास नकार दिला. तरुणाच्या जातीत आपल्याला मुलगी देण्याची इच्छा नसल्याचं सांगत त्याला गावात येण्यासही मनाई केली. त्यामुळे तरुण हतबल झाला असून आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठी कायद्याची दारं ठोठावतो आहे.

हे वाचा - मोठी बातमी ! राज्यात 5 महिन्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा भयावह

पतीने व्यक्त केली भिती

आपल्या पत्नीला तिच्या घरचे सोडत नसल्याने आणि आपल्याला गावात येऊ देत नसल्याने पोलिसांनी यात हस्तक्षेप करून मदत करावी, अशी अपेक्षा तरुणाने व्यक्त केली आहे. आपल्याला जर वेळेत सोडवलं नाही, तर आपले घरचे आपल्याला मारून टाकतील, अशी माहिती तरुणीनं दिल्याचं तिच्या पतीनं म्हटलं आहे. पोलीस याबाबत जलद हालचाल करत नसल्याची तरुणाची तक्रार आहे. याबाबत पोलिसांनी लवकरात लवकर तिची सुटका करून तिच्या जिवाला असणारा धोका संपवावा, अशी अपेक्षा तरुणाने व्यक्त केली आहे.

First published:
top videos

    Tags: Marriage, Wife and husband