जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आता भावना गवळी शिवसेनेला देणार धक्का, 'त्या' निर्णयाचा घेणार बदला, नगरसेवकांनी केली तयारी

आता भावना गवळी शिवसेनेला देणार धक्का, 'त्या' निर्णयाचा घेणार बदला, नगरसेवकांनी केली तयारी

भावना गवळी गटातील 8 नगरसेवकांसह 30 पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार आहे.

भावना गवळी गटातील 8 नगरसेवकांसह 30 पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार आहे.

भावना गवळी गटातील 8 नगरसेवकांसह 30 पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 17 जुलै : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. आता खासदार भावना गवळी सुद्धा शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहे. भावना गवळी गटातील 8 नगरसेवकांसह 30 पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार आहे. शिवसेनेतील नेत्यांच्या बंडाळीनंतर आता कार्यकर्ते सुद्धा शिंदे गटात सामील होत आहे. त्यात खासदार भावना गवळी यांचा गटाच्या 8 नगरसेवकांसह 30 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता शिवसेनेला हा पुन्हा ऐक धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे गटाचे ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र पाठक हे शनिवारपासून यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असून शिंदे गटाच्या समर्थनासाठी चाचपणी करत आहे. कालपर्यंत शिंदे गटाचे समर्थनार्थ आमदार संजय राठोड यांचे कार्यकर्ते होते. मात्र आता खासदार भावना गवळी यांचे कार्यकर्तेही समर्थन देणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिंदे गट भक्कम होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात भावना गवळी (Bhavana Gawali) यांची लोकसभेतील पक्ष प्रतोदपदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना संसदीय नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं. या पत्रात भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवण्याची मागणी केली. ( शिंदे-फडणवीसांचा निर्णय चुकीचा, खडसेंनी भाजपमधलाच अनुभव जाहीरपणे सांगितला ) भावना गवळी यांच्या जागी शिवसेना खासदार राजन विचारे (Rajan Vichare) हे शिवसेनेचे लोकसभेतील नवे प्रतोद असतील. मुख्य म्हणजे राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या मतदारसंघातूनच लोकसभेमध्ये निवडून गेले आहेत. शिवसेनेने संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर असताना भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली आहे, त्यामुळे भावना गवळीही बंडाच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ( Oh no! झोपलेल्या मितालीसोबत सिद्धार्थ हे काय करून बसला; VIDEO पाहा ) या निर्णयाविरोधात गवळी समर्थक शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आलं. भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी, अन्यथा आमच्या पदांचे राजीनामे मंजूर करावेत, असा अल्टिमेटमच या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात