मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Siddharth Chandekar: Oh no! झोपलेल्या मितालीसोबत सिद्धार्थ हे काय करून बसला; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'आता तू मेलास, संपलास'

Siddharth Chandekar: Oh no! झोपलेल्या मितालीसोबत सिद्धार्थ हे काय करून बसला; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'आता तू मेलास, संपलास'

सिद्धार्थच्या या कृतीने आता त्याची काही खैर नाही अशी चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नेमकं काय केलं सिद्धार्थने?

सिद्धार्थच्या या कृतीने आता त्याची काही खैर नाही अशी चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नेमकं काय केलं सिद्धार्थने?

सिद्धार्थच्या या कृतीने आता त्याची काही खैर नाही अशी चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नेमकं काय केलं सिद्धार्थने?

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 16 जुलै: सिद्धार्थ चांदेकर हा अभिनेता सध्या बराच चर्चेत असतो. सिद्धार्थचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. सिद्धार्थ कायमच त्याच्या खट्याळ आणि मिश्किल अंदाजासाठी ओळखला जातो. पण सिद्धार्थने त्याच्या बायकोसोबत आज असं काही केलं आहे ज्यामुळे त्याला वाचवायला त्याचा चाहतावर्गही येऊ शकत नाही.

सिद्धार्थ आणि त्याची बायको मिताली या (Siddharth Chandekar and Mitali Mayekar funny reel) कपलचे चाहते कायमच त्यांचे फनी व्हिडीओ एन्जॉय करताना दिसतात. आजही सिद्धार्थने असाच एक विडिओ पोस्ट केला आहे जो बघून त्याची बायको म्हणजे मिताली त्याची चांगलीच खरडपट्टी काढणार असा अंदाज चाहते लावत आहेत.

या व्हिडिओमध्ये मिताली आराम करताना दिसत असून तिच्या या झोपेचा फायदा घेऊन सिद्धार्थने तिची फजिती करणारं नवं रील तयार केलं आहे. या रिलमध्ये कपलचा गायनाचा आवाज आवाज येत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तो लिहितो, “आमचं पहिलं वहिलं duet गाणं, आणि माझ्या बायकोने उत्तम कामगिरी केली याचा आनंद आहे असं मला वाटत.” या व्हिडिओमध्ये तिच्या झोपण्यावर भर देत तिने गंमतीत तिची खिल्ली उडवली आहे. सिद्धार्थ मितालीला निशाणा बनवून अशी धमाल अनेकदा करत असतो. या कपलमध्ये रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक धमाल गोष्टी कॅमेरात कैद करून तो पोस्ट करत असतो. मिताली सुद्धा कमी नाहीये. ती ही सिद्धार्थच्या अशा फजित्यांवर कायम पलटवार करत असते.

पण सिद्धार्थने गाठलेला हा कहर पाहून आता मितालीने हा व्हिडिओ बघितल्यावर त्याची काही खैर नाही अशी प्रतिक्रिया चाहत्यांकडून येताना दिसत आहे. त्याच्या या मजेशीर रीलवर अनेक कलाकारांनी सुद्धा पोटभर हसल्याचं कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा- Ankita Lokhande: अंकिताचा नवा लुक बघून चाहत्यांना आठवलं गोणपाट अन् गोधडी, ट्रोल करत म्हणाले...

तर अभिनेत्री सखी गोखलेने सिद्धार्थला ‘किती हरामी आहेस’ असं सुद्धा म्हटलं आहे.

सिद्धार्थ आणि मिताली हे क्युट कपल कायम चाहत्यांचं लाडकं राहिलं आहे. सिद्धार्थ जितकी मितालीची टिंगल करतो तितकंच प्रेम करतो आणि तिला सपोर्ट करतो हे अनेकदा दिसून आलं आहे. सध्या चाहते या व्हिडिओची मजा लुटताना दिसत आहेत.

First published:

Tags: Funny video, Instagram, Marathi entertainment, Siddharth chandekar