संगमेश्वर, 27 जुलै: महिलांवर अश्लील शेरेबाजी (Offensive remark) केल्याच्या रागातून एका तरुणानं 67 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या (old man murder) केल्याची घटना समोर आली आहे. मृत वृद्ध मागील बऱ्याच काळापासून गावातील महिलांवर अश्लील शेरेबाजी करत होता. गावातील लहान मोठ्यांनी त्याला अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याची खोड काय मोडत नव्हती. वृद्धाच्या या वागण्याचा राग आल्यानं गावातील एका तरुणाने वृद्धाला बेदम मारहाण (Beating) केली आहे. या मारहाणीत संबंधित वृद्धाचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे.
संबंधित घटना रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या संगमेश्वर (Sangmeshwar) तालुक्यातील येगाव बौद्धवाडी याठिकाणी घडली आहे. तर नथुराम भागूराम जाधव असं हत्या झालेल्या 67 वर्षीय वयोवृद्धाचं नाव आहे. याप्रकरणी विनोद चंद्रकांत कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत नथुराम हा मागील बऱ्याच काळापासून गावातील महिलांची मुद्दाम खोड काढत असे. रस्त्यावरू जाणाऱ्या येणाऱ्या महिलांवर अश्लील शेरेबाजी करायचा.
हेही वाचा-औषध असल्याचं सांगत बापानं पोटच्या मुलाला पाजलं विष; नगरमधील धक्कादायक घटना
सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, मृत नथुराम जाधव याला गावातील अनेक लोकांनी यापूर्वी समज दिली होती. पण त्याची खोड काही मोडत नव्हती. महिलांना अश्लील शेरेबाजी करणं त्यानं सुरूच ठेवलं होतं. म्हाताऱ्याच्या या वागण्यातून आरोपी विनोद कदम यानं घरात घुसून वृद्धाला मारहाण केली आहे. डोक्यात काठीचा जोरदार फटका मारल्यानं जाधव हे जागीच कोसळले आणि यातचं त्यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-जालना: संपत्तीपुढे बापाचं प्रेम हरलं; मुलानं जन्मदात्या वृद्ध पित्याचा आवळला गळा
ही घटना घडल्यानंतर वृद्धाची पत्नी नमिता नथुराम जाधव (वय-55) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत विनोद चंद्रकांत कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Ratnagiri