मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /औषध असल्याचं सांगत बापानं पोटच्या मुलाला पाजलं विष; नगरमधील धक्कादायक घटना

औषध असल्याचं सांगत बापानं पोटच्या मुलाला पाजलं विष; नगरमधील धक्कादायक घटना

Crime in Ahmednagar: : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) याठिकाणी एका व्यक्तीनं आपल्या पोटच्या मुलाला जबरदस्तीनं विष पाजून (Father gave poison to son) जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to murder) केला आहे.

राहुरी, 27 जुलै: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) याठिकाणी एका व्यक्तीनं आपल्या पोटच्या मुलाला जबरदस्तीनं विष पाजून (Father Give poison to son) जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to murder) केला आहे. मागील अठरा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणाचा जबाब नोंदवून घेतला आहे. जन्मदात्या वडिलांनीच विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी विविध कलमांतर्गत वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

गणेश म्हसे असं विषप्रयोग झालेल्या 35 वर्षीय तरुणाचं नाव आहे. पीडित गणेश राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील रहिवासी आहे. लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, 9 जुलै पीडित तरुणाच्या बापानं आपल्या लहान मुलाच्या मदतीनं गणेश याला विष पाजलं. आरोपींनी औषध असल्याचा बहाणा करत जबरदस्तीनं गणेशला विष दिलं होतं. पण वडिलांनी दिलेलं औषध प्यायल्यानं काही काळातचं गणेशची प्रकृती खालावली आणि तो बेशुद्ध पडला.

हेही वाचा-सेल्फीच्या वेडानं विद्यार्थ्यांचा घेतला जीव; एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं

गणेश बेशुद्ध पडल्यानं अन्य नातेवाईकानं त्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल करताना त्याची प्रकृती खूपच गंभीर होती. मागील 18 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर, गणेशला रविवारी बरं वाटू लागलं आहे. यानंतर राहुरी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित गणेश याचा जबाब नोंदवून घेतला आहे. यातून बापानेच मुलाला विष पाजल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-आईच्या अंगावर कुत्रा भुंकल्यानं लेक चवताळला; पुण्यात श्वानाच्या मालकीणीला मारहाण

आरोपी वडिलांनी आपल्या पोटच्या मुलावर विषप्रयोग का केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलीस नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत. संपत्तीच्या वादातून हत्येचा प्रयत्न झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेचा तपास राहुरी पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Crime news