अंबड, 27 जुलै: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड याठिकाणी एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं दीड एकर जमिनीसाठी आपल्या वयोवृद्ध पित्याची गळा आवळून हत्या (Son murdered father) केली आहे. ही उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी मुलाला अटक (Accused son arrest) केली आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पंढरीनाथ श्रीपती भवर असं हत्या झालेल्या 65 वर्षीय वडिलांचं नाव आहे. तर सर्जेराव पंढरीनाथ भवर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आरोपी मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत अंबड तालुक्यातील झिरपी पांडा याठिकाणी वास्तव्याला होता. मागील काही दिवसांपासून आरोपी मुलगा वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर करावी, यासाठी तगादा लावला होता. पण वडिलांनी जमीन मुलाच्या नावावर करण्यास नकार दिला. यामुळे मुलाचा आपल्या वडिलांवर राग होता.
हेही वाचा-नाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा
यातूनच आरोपी मुलानं 25 जुलै रोजी रविवारी पहाटे आपल्या वयोवृद्ध वडिलांची दोरीनं गळा आवळून हत्या केली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीड एकर जमिनीच्या मोहापोटी आरोपीनं आपल्या वडिलांची हत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
हेही वाचा-आईच्या अंगावर कुत्रा भुंकल्यानं लेक चवताळला; पुण्यात श्वानाच्या मालकीणीला मारहाण
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच आरोपी मुलगा सर्जेराव भवर यालाही अटक केली. 26 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं आरोपीला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.