संकेश्वर, 17 जानेवारी: संकेश्वर येथील कमतनूर वेस याठिकाणी एका 55 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेच्या छातीत आणि डोक्यात गावठी कट्ट्याने गोळ्या झाडून (Gun firing) त्यांची हत्या करण्यात (55 years old woman shot dead)आली आहे. या प्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. मालमत्ता किंवा संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. शैलजा उर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार असं हत्या झालेल्या 55 वर्षीय महिलेचं नाव असून त्या संकेश्वर येथील कमतनूर वेस परिसरातील रहिवासी होत्या. याठिकाणी त्या दुमजली घरात एकट्या राहत होत्या. त्यांनी आपल्या तळमजल्यावरील काही गाळे भाड्याने दिले होते. शैलजा यांचा वीस वर्षांपूर्वी निरंजन सुभेदार यांच्याशी विवाह झाला होता. पण दहा वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. त्यांना कोणतंही मूलबाळ नसल्याने त्या घरी एकट्याच राहत होत्या. मृत शैलजा यांचं माहेर देखील संकेश्वर येथेच आहे. हेही वाचा- भावाच्या डोळ्यादेखत 9 जणांनी तरुणावर केले 36 वार; औरंगाबादला हादरवणारी घटना दरम्यान, घटनेच्या दिवशी तळमजल्यावरील गाळ्यात भाड्याने राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने शैलजा यांना अनेक हाका मारल्या. पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घरात प्रवेश केला असता, शैलजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या आहेत. त्यांच्या छातीत आणि डोक्यात अज्ञाताने गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हेही वाचा- संक्रांतीसाठी घरी आलेल्या लेकीला दिली आयुष्यभराची जखम; बापाचं कृत्य वाचून हादराल आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी श्वान पथक आणलं असता, हे श्वान घटनास्थळापासून आसपासचं घुटमळत राहिलं. त्यामुळे शैलजा यांच्यासोबत नेमकं काय घडलं? आणि त्यांची हत्या कोणी केली? याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. मालमत्तेचा वाद किंवा आर्थिक व्यवहारातून त्यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.