Home /News /aurangabad /

भावाच्या डोळ्यादेखत 9 जणांनी तरुणावर केले 36 वार; सिनेस्टाईल हत्येनं औरंगाबाद हादरलं

भावाच्या डोळ्यादेखत 9 जणांनी तरुणावर केले 36 वार; सिनेस्टाईल हत्येनं औरंगाबाद हादरलं

Murder in Aurangabad: शनिवारी मध्यरात्री हत्येची एक थरारक घटना औरंगाबादेतील (Aurangabad) मिसारवाडी येथे घडली आहे. येथील नऊ जणांच्या टोळीनं एका 25 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे.

    औरंगाबाद, 17 जानेवारी: शनिवारी मध्यरात्री हत्येची एक थरारक घटना औरंगाबादेतील (Aurangabad) मिसारवाडी येथे घडली आहे. येथील नऊ जणांच्या टोळीनं एका 25 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे. आरोपींनी धारदार चाकुने तब्बल 36 वेळा वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, यामध्ये संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. परिसरातील भाईगिरीचे वर्चस्व आणि जुन्या वादाच्या कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृताच्या भावानं सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नऊ जणांविरोधात हत्येचा गुन्हा (FIR lodged) दाखल केला आहे. या  घटनेचा पुढील तपास जिन्सी, गुन्हे शाखा आणि सिडको पोलीस संयुक्तपणे करत आहेत. हत्येची घटना घडल्यानंतर रविवारी दिवसभरात पोलिसांनी चार आरोपींना अटक (4 accused arrested) केली आहे. अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. हेही वाचा-संक्रांतीसाठी घरी आलेल्या लेकीला दिली आयुष्यभराची जखम; बापाचं कृत्य वाचून हादराल हसन साजिद पटेल असं हत्या झालेल्या 25 वर्षीय युवकाचं नाव आहे. तो औरंगाबादेतील मिसारवाडी येथील रहिवासी असून प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. भाईगिरीच्या वर्चस्वासाठी मृत हसन याचा परिसरातील काही तरुणांसोबत वाद सुरू होता. दरम्यान, काल रात्री नऊच्या सुमारास मृत हसन आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बुलेट घेऊन घराबाहेर पडला होता. घराबाहेर गेल्यानंतर बराच वेळ होऊनही हसन घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन बंद लागला. हेही वाचा-विरार हादरलं! संपत्तीच्या वादातून भावाचे बहिणीवर कोयत्याने वार,घटनेचा LIVE VIDEO त्यामुळे हसनचा भाऊ जावेद त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. दरम्यान रात्री अकराच्या सुमारास हसन मिसारवाडी परिसरातील एका पान टपरीजवळ सिगारेट ओढत उभा असल्याचा दिसला. याचवेळी हसनच्या दिशेनं धावत आलेल्या नऊ जणांच्या टोळीनं हसनवर धारदार शस्त्राने सपासप वारे केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होती की, हसनचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. आरोपींनी तब्बल 36 वार केले आहेत. हेही वाचा-70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना ही थरारक घटना घडल्यानंतर, मृताचा भाऊ जावेद यानं सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. जावेदच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तालेब सुलतान चाऊस, सुलतान चाऊस, नासेर सुलतान चाऊस, अली सुलतान चाऊस, नासीर अब्दुल पटेल, रहीम अन्सारी, मुसा शेख, रियाज उर्फ डॉन, आणि आखेफ उर्फ गोल्डन युनूस कुरेशी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रविवारी चार जणांना अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Murder

    पुढील बातम्या