Home /News /national /

संक्रांतीसाठी माहेरी आलेल्या लेकीला दिली आयुष्यभराची जखम; नराधम बापाचं कृत्य वाचून हादराल

संक्रांतीसाठी माहेरी आलेल्या लेकीला दिली आयुष्यभराची जखम; नराधम बापाचं कृत्य वाचून हादराल

Crime News:बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका जन्मदात्या बापाने मकरसंक्रातीसाठी माहेरी आलेल्या विवाहित मुलीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे.

    श्योपूर, 17 जानेवारी: बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीसाठी माहेरी आलेल्या एका विवाहित मुलीवर (married daughter come home to celebrate makarsankranti) तिच्याच वडिलांनी बलात्कार (Father raped married daughter) केला आहे. पीडित मुलीची आई घरी नसताना आरोपीनं आपल्या पोटच्या लेकीलाच वासनेचा शिकार बनवलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीनं आपल्या आईसह पोलीस ठाण्यात जाऊन बापाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) करत नराधम बापाला अटक (Accused Father arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्याच्या विजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पीडित विवाहित मुलगी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आपल्या माहेरी आली होती. तर पीडित मुलीची आई मकरसंक्रांतीसाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे माहेरी आलेली पीडित मुलगी आपल्या बहीण-भावांसह वडिलांसोबत राहत होती. हेही वाचा-6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून मृतदेह लपवला घरात; कृत्याने कुटुंब हादरलं दरम्यान, घटनेच्या दिवशी रात्री उशिरा नराधम बापाच्या डोक्यात वासनेचं भूत शिरलं. त्यानं गाढ झोपी गेलेल्या आपल्या पोटच्या लेकीसोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. यावेळी अचानक जाग आल्यानंतर पीडित मुलीनं बापाच्या या कृत्याला विरोध केला. पण नराधम बापाने विकृतीच्या परिसीमा गाठत आपल्याच पोटच्या मुलीवर अमानुषपणे बलात्कार केला आहे. हेही वाचा-20 वर्षीय तरुणीवर कारमध्ये रेप, निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्यानेच दिल्या नरक यातना या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीनं आपल्या आईसह विजयपूर पोलीस ठाण्यात जाऊन बापाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास विजयपूर पोलीस करत आहे. पण पोटच्याच मुलीवर बापाने अशाप्रकारे बलात्कार केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh, Rape

    पुढील बातम्या