मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

माळशेज घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू, 6 जखमी

माळशेज घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू, 6 जखमी

Car Accident in Malshej Ghat: कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात एका कारला भीषण अपघात झाला आहे. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली (car crash into valley) आहे.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 07 नोव्हेंबर: कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात (Malshej ghat) एका कारला भीषण अपघात (Car accident) झाला आहे. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली (car crash into valley) आहे. या दुर्दैवी घटनेत एक महिलेचा जागीच मृत्यू (Woman died in accident) झाला आहे. तर कारमधील अन्य सहा जण गंभीर जखमी (6 injured) झाले आहेत. कार दरीत कोसळल्यानंतर कारने पेट घेतल्याचं देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या काही औरंगाबादच्या तरुणांनी जखमींना बाहेर काढलं आहे. या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना देण्यात आली आहे. संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या 55 वर्षीय महिलेचं नाव सखुबाई उगले असं आहे. तर उषा सूर्यकांत कोकणे, उर्मिला चंद्रकांत लागे, पांडुरंग नामदेव मिलखे, सोनाली गणेश काटे, ऋषीकेश सूर्यकांत कोकणे आणि चालक आकाश शंकर गेगजे असं जखमी झालेल्यांची नावं आहेत. संबंधित सर्व जखमींना उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा-मुंबई: रात्रपाळीस गेलेला नवरा घरी परतला अन् भयावह अवस्थेत दिसली नवविवाहित पत्नी अपघातग्रस्त कारमधील सर्वजण कल्याणहून माळशेज घाटमार्गे वाडा (ता. खेड, जि. पुणे) येथे जात असताना हा अपघात घडला आहे. संबंधित सर्वजण इको कारने जात होते. दरम्यान माळशेज घाटातून जात असताना लाजवंती पॉईंट जवळ कारचालकाचं अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि काही कळायच्या आत कार दरीत कोसळली आहे. दरीत कोसळल्यानंतर कारने अचानक पेटही घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. हा अपघात आज पहाटे साडे तीनच्या सुमारास घटला आहे. हेही वाचा-पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्..; डजनभर नराधमांनी तोडले लचके, नग्नावस्थेतच फेकलं हा अपघात घडताच मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या औरंगाबाद येथील ट्रेकर्संनी घटनास्थळी वेळीच धाव घेतली आणि तातडीनं मदत कार्य सुरू केलं. यामुळे कारमधील अन्य सहा जणांचे जीव वाचले आहेत. संबंधित सर्वांना उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना देण्यात आली आहे.
First published:

Tags: Death, Pune, Road accident

पुढील बातम्या