• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • संतापजनक! शाळेत शिक्षकाकडून सुरू होतं लैंगिक शोषण; बारावीच्या विद्यार्थिनीनं उचललं भयावह पाऊल

संतापजनक! शाळेत शिक्षकाकडून सुरू होतं लैंगिक शोषण; बारावीच्या विद्यार्थिनीनं उचललं भयावह पाऊल

Crime Against Minor Girl: शाळेत शिक्षकाकडून सुरू असलेल्या लैंगिक शोषणाच्या (Sexual Harassment) त्रासाला कंटाळून एका बारावीच्या विद्यार्थिंनीनं (12th grade female student)भयावह पाऊल उचललं आहे.

 • Share this:
  कोयम्बतूर, 13 नोव्हेंबर: शाळेत शिक्षकाकडून सुरू असलेल्या लैंगिक शोषणाच्या (Sexual Harassment) त्रासाला कंटाळून एका बारावीच्या विद्यार्थिंनीनं (12th grade female student)भयावह पाऊल उचललं आहे. आई-वडील बाहेर गेले असता, तरुणीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट (Minor student commits suicide) केला आहे. आई वडील घरी परत आल्यानंतर मुलीला लटकलेल्या अवस्थेत पाहून त्यांना धक्काच बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी पोलिसांनी मृत मुलीच्या खोलीतून एक सुसाईड नोट (Suicide note) मिळाली असून त्यामध्ये तीन जणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना तामिळनाडू राज्यातील कोयम्बतूर येथील आहे. याच शहरातील रहिवासी असणारी 17 वर्षीय पीडित तरुणी एका खाजगी शाळेत इयत्ता बारावीत शिकत होती. गेली काही दिवस कोरोनामुळे शाळा बंद राहिल्यानंतर, अलीकडेच तामिळनाडूमधील शाळा सुरू झाल्या होता. पीडित मुलीनं देखील शाळेत जायला सुरुवात केली होती. पण शाळेतील शिक्षक मिथुन चक्रवर्ती याची पीडितेवर वाईट नजर होती. आरोपी पीडितेला एकटं गाठून तिचं लैंगिक शोषण करत होता. हेही वाचा-Pune: कंपनीत सोबत काम करणाऱ्या तरुणीवर रेप; जेवण बनवण्यासाठी घरी बोलावलं अन्... बरेच दिवस अत्याचार सहन केल्यानंतर, पीडितेनं सध्याची शाळा सोडायची असल्याची मागणी आपल्या कुटुंबीयांकडे केली. त्यानुसार शाळेतून दाखला देखील देण्यात आला. पण शुक्रवारी पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. शाळेतील एक शिक्षक तिचं लैंगिक शोषण करत होता, त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी प्राचार्यांकडे तक्रार करूनही आरोपीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपी देखील पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. हेही वाचा-बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलिसानंही केलं लैंगिक शोषण तसेच पीडित मुलीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत देखील आरोपी शिक्षक मिथुन चक्रवर्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: