Home /News /pune /

Pune: कंपनीत सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार; जेवण बनवण्यासाठी घरी बोलावलं अन्...

Pune: कंपनीत सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार; जेवण बनवण्यासाठी घरी बोलावलं अन्...

Crime in Pune: पुण्यातील एका तरुणाने कंपनीत सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार (rape on colleague) केल्याची घटना समोर आली आहे.

    पुणे, 13 नोव्हेंबर: पुण्यातील (Pune) एका तरुणाने कंपनीत सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार (rape on colleague) केल्याची घटना समोर आली आहे.  एकाच ठिकाणी नोकरी करत असल्याने झालेल्या ओळखीतून आरोपीनं पीडित तरुणीवर अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडित तरुणीला जेवण बनवण्यासाठी घरी बोलावून (Called home to make meal and raped) तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. याप्रकरणी 26 वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वाकड पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा तपास केला जात आहे. गणेश सुधाकर पारटकर असं गुन्हा दाखल झालेल्या 26 वर्षीय आरोपीचं नाव असून तो थेरगाव येथील रहिवासी आहे. आरोपी गणेश आणि पीडित तरुणी एकाच ठिकाणी नोकरीला आहेत. नोकरी करत असताना, दोघांची मैत्री झाली होती. याच ओळखीतून आरोपीनं पीडित तरुणीला जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतलं. याठिकाणी आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हेही वाचा- अमेरिकेतील प्रियकराने पुण्यातील तरुणीच्या संसारात कालवलं विष; लग्नापूर्वीचा SEX VIDEO पतीला पाठवला अन्... यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार घरी आणि रावेत येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले आहेत. यानंतर पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाबद्दल विचारणा केली असता. आरोपीनं आपण दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न केल्याची माहिती पीडितेला दिली आहे. हे ऐकून पीडितेला धक्काच बसला. यानंतर आरोपी पीडितेशी पुन्हा जबरदस्ती करू लागला. यावेळी पीडितेनं आरोपीचा विरोध केला असता, त्याने पीडितेला हाताने मारहाण करत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले आहेत. हेही वाचा-बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलिसानंही केलं लैंगिक शोषण आरोपीनं आपली फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर, पीडित तरुणीनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape case

    पुढील बातम्या