मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाच्या भीतीने कर्मचारी गायब, पुणे-मुंबईचा दूध पुरवठा ठप्प होण्याची शक्यता

कोरोनाच्या भीतीने कर्मचारी गायब, पुणे-मुंबईचा दूध पुरवठा ठप्प होण्याची शक्यता

एवढंच नाहीतर दुधाची वाहतूक करणारे ड्रायव्हर क्लिनर काम करण्यास तयार नाहीत.

एवढंच नाहीतर दुधाची वाहतूक करणारे ड्रायव्हर क्लिनर काम करण्यास तयार नाहीत.

एवढंच नाहीतर दुधाची वाहतूक करणारे ड्रायव्हर क्लिनर काम करण्यास तयार नाहीत.

कोल्हापूर, 27 मार्च :  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीने पुणे-मुंबईमधील कर्मचारी गावी गेल्याने दुग्धव्यवसायावर संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात दूध पुरवठा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांसह खासगी कंपन्यांमध्येही कामगारांना वर्क फ्रॉर्म होम करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हे शक्य नसल्यामुळे कामगारांना घरीच राहण्याची सूचना देण्यात आली आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावरही झाला आहे.  कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ दूध संघामध्ये 50 टक्के कर्मचारी कामावर आहे. मात्र, पुणे-मुंबईमधील कर्मचारी गावी गेले आहे. बरेच कर्मचारीही कोरोनाच्या भीतीने कामावर येण्यास तयार नाही. त्यामुळे पुण्या-मुंबईचा दूध पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - धक्कादायक! Coronavirus दरम्यान 36 वर्षीय अभिनेत्याचं निधन एवढंच नाहीतर दुधाची वाहतूक करणारे ड्रायव्हर क्लिनर काम करण्यास तयार नाहीत.  मुंबईमध्येही दुधाचे पॅकिंग करणारे कामगार उपलब्ध नाही, अशी माहिती समोर आहे. भरात भर म्हणजे, पशुखाद्य कारखान्यातील कामगारही गावी गेल्याने अडचण निर्माण झाल्या आहेत. कोल्हापुरातील गोकुळ दूधकडून यावर उपाययोजना करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दूध, फळं आणि भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांनी सूट दिली आहे.  शहराला फळभाज्या, फळं जे ट्रक वाहतूक करणार आहे. त्यांना आधीच परवाने देण्यात येत आहे. तसंच या वाहनांना पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. हेही वाचा -विदर्भात कोरोना पसरला, नागपूर-गोंदियात आढळले 5 रुग्ण! साखर कारखान्यात ऊस गळतीला आणावा, जे ऊसतोड मजूर येतील त्यांच्या जेवणाची काळजी कारखानदारांना घ्यावी लागणार आहे, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, राज्यात संचारबंदी लागू झाल्यामुळे सर्वच हॉटेल व्यवसाय बंद झाले आहे. त्यामुळे मुंबईत चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहे. त्या पॉर्श्वभूमीवर  हॉटेलमधून जेवणाची डिलेव्हरी मिळणार आहे. फक्त अन्न डिलेव्हरी करणाऱ्या तरुणांनी योग्य ती काळजी घ्यायची आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. कोकणातील आंबे, नाशिकचे द्राक्ष देखील बाजारात विकत येणार आहे.  विक्रेत्यांनी फक्त विक्री करताना काळजी घ्यावी, अशी महत्त्वाची माहितीही पवार यांनी दिली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या