मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रायगडावर राख सदृश्य वस्तू घेऊन येणाऱ्या 'त्या' 4 तरुणांना अटक

रायगडावर राख सदृश्य वस्तू घेऊन येणाऱ्या 'त्या' 4 तरुणांना अटक


8 डिसेंबर रोजी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी स्थळी राख सदृष्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यासाठी काही तरुण आले होते.

8 डिसेंबर रोजी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी स्थळी राख सदृष्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यासाठी काही तरुण आले होते.

8 डिसेंबर रोजी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी स्थळी राख सदृष्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यासाठी काही तरुण आले होते

रायगड, 12 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी किल्ले रायगडावर (raigad fort) छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या समाधी समोर राख सदृष्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यासाठी आलेल्या काही तरुणांचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमुळे शिवप्रेमींमध्ये कमालीचा संताप पाहण्यास मिळाला होता. अखेर या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

8 डिसेंबर रोजी दुपारी किल्ले रायगडावरील शिव समाधी स्थळी राख सदृष्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यासाठी काही तरुण आले होते. पण यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्या पुजा झोळे आणि इतर कार्यकर्त्यांनी या तरुणाला अडवले.

या प्रकरणावरून वाद निर्माण झाला होता.  या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत मुद्देमाल ताब्यात घेतला होता.  सदर राख सदृष्य पावडर ही दिवंगत शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्या पुजा झोळे यांनी केला होता.

हाय रिटर्न मिळवताना सतर्क राहा, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा इशारा

आज पुजा झोळे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्या, धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. पुजा झोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सौरभ कर्डे, शैलेश वरखडे, ओंकार घोलप आणि किरण जगताप यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई केवळ कारवाई न होता दुष्कृत्य करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक ठरावा, अशी मागणी या प्रकरणातील फिर्यादी पुजा झोळे यांनी केली होती. पोलिसांमध्ये तक्रार झाल्यानंतर अखेरीस पोलिसांनी या प्रकरणातील चौघांना अटक केली आहे.

निवडणूक हरला म्हणून उमेदवाराने मतदारांनाच दिली शिक्षा; Video समोर आल्यानंतर अटक

'रायगड किल्ल्यावर त्या दिवशी अत्यंत घाणरेडा प्रकार घडला होता. या चार तरुणांनी अस्थी शिवरायांच्या समाधीला लावण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आम्ही तक्रार दाखल केली असून कलम 295, 153 अ नुसार कारवाई करण्यात आली आहे, अशी कृती करणाऱ्या धडा शिकवावा म्हणून हे पाऊल उचलले आहे. या प्रकरणामागे मास्टरमाईंड असलेल्या हे शोधले पाहिजे, या तरुणांनी कोणत्या कोणत्या गडावर हे कृत्य केले आहे, याचा शोध घ्यावा', अशी मागणी पूजा झोळे यांनी केली.

First published:

Tags: Raigad police