पाटना, 12 डिसेंबर : बिहारमधील (Bihar News) औरंगाबादच्या पंचायत निवडणुकीच्या (Panchayat Election) उमेदवाराने मतदानापूर्वी मतदारांकडे समाजसेवा करण्याचं वचन दिलं. त्यानंतर आपल्याला मत द्यावं यासाठी त्यांना पैसे दिले. मात्र जेव्हा मतं मिळाली नाही, तर त्याचा पारा चढला आणि तो मतदारांना मारहाण करीत सुटल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवार घरोघरी येऊन भेट देत असल्याचं आपण नेहमीच पाहतो. मात्र मत दिलं नाही म्हणून मतदारांना मारहाण केल्याचा विचित्र प्रकार बिहारमधील औरंगाबाद येथून समोर आला आहे. पंचायत निवडणुकीच्या उमेदवाराने प्रथम मतदारांना समाजसेवा करण्याचं वचन दिलं. यानंतर आपल्याला मत देण्यासाठी पैसे दिले. मात्र मत न मिळाल्याने उमेदवाराने मतदारांना मारहाण केली. यानंतर उठा-बशा काढायला लावले. यानंतरही त्याचं मन भरलं नाही तर भररस्त्यात थुंकू चाटायला लावली. हे धक्कादायक फोटो सध्या परिसरात व्हायरल झाले आहेत. हे ही वाचा-
पत्नीला घेऊन जाण्यास नकार देणाऱ्या सासऱ्याचा जावयाकडून खून
आरोपी उमेदवार बलवंत कुमार डुमरी पंतायत सिघना गावातील राहणारा आहे. हा व्हिडीओ खरांटी टोले भुइया बिगहा गावातील आहे. या गावातील दोन तरुण अनिल कुमार आणि मंजीर यांना उमेदवाराने उठा-बशा काढायला लावला. याशिवाय आक्षेपार्ह वक्तव्यही केलं. यातील एका तरुणाला रस्त्यावर थुंकू चाटायला लावत असल्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.
तर दुसरीकडे आरोपीव पक्षाने सांगितलं की, दोन्ही तरुण दारू पिऊ गावात गोंधळ घालत होते. यासाठी नशा उतरल्यानंतर त्यांना उठा-बशा काढायला लावल्या. हे दोघे नियमित दारू पिऊन लोकांना शिवीगाळ करतात, असाही त्यांच्यावर आरोप केला. मात्र व्हिडीओमधी संभाषण वेगळीच बाब सांगत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनीही कारवाई केली आहे. औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रा यांच्या निर्देशानंतर अंबा पोलिसांनी बलवंत सिंह याला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.