मराठी बातम्या /बातम्या /मनी /हाय रिटर्न मिळवताना सतर्क राहा, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा इशारा

हाय रिटर्न मिळवताना सतर्क राहा, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा इशारा

गुंतवणूकदारांनी उच्च परतावा मिळवण्याच्या इच्छेने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच पैसे गुंतवण्याआधी त्याची पूर्ण माहिती घेणे देखील आपली जबाबदारी आहे, असं शक्तीकांत दास यांनी म्हटलं.

गुंतवणूकदारांनी उच्च परतावा मिळवण्याच्या इच्छेने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच पैसे गुंतवण्याआधी त्याची पूर्ण माहिती घेणे देखील आपली जबाबदारी आहे, असं शक्तीकांत दास यांनी म्हटलं.

गुंतवणूकदारांनी उच्च परतावा मिळवण्याच्या इच्छेने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच पैसे गुंतवण्याआधी त्याची पूर्ण माहिती घेणे देखील आपली जबाबदारी आहे, असं शक्तीकांत दास यांनी म्हटलं.

मुंबई, 12 डिसेंबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी रविवारी ठेवीदारांना उच्च परतावा (High Return) देण्याबाबत सावध केले. शक्तीकांत दास यांनी गुंतवणूकदारांना सावध केले आहे की त्यांनी उच्च परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 'डिपॉझिटर्स फर्स्ट: गॅरंटीड टाइम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट अप टू 5 लाख' (Depositors First: Guaranteed Time-bound Deposit Insurance Payment up to Rs 5 lakh) या कार्यक्रमात दास यांनी रविवारी सांगितले की उच्च परताव्यात, जोखीम देखील जास्त असते.

शक्तीकांत दास पुढे म्हणाले, जोखीम देखील जास्त आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी उच्च परतावा मिळवण्याच्या इच्छेने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच पैसे गुंतवण्याआधी त्याची पूर्ण माहिती घेणे देखील आपली जबाबदारी आहे. बँकिंग प्रणालीची ताकद आणि क्षमता सुनिश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे. मात्र हे काम मिळून करावे लागेल. बँक व्यवस्थापन, ऑडिट समिती, जोखीम व्यवस्थापन समिती किंवा कोणतेही नियामक प्राधिकरण असो, बँकिंग प्रणालीमध्ये सहभागी असलेल्या सर्व भागधारकांची ही जबाबदारी आहे.

विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी ऐकून थक्क व्हाल! अनेक कंपन्याच्या CEO पेक्षा अधिक कमाई

तुमच्या बँकेत जमा पैशावर 5 लाखांचा विमा उपलब्ध

सरकारने बँक ठेव विमा संरक्षण 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केले आहे. बँकांमधील 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींच्या सुरक्षिततेची हमी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे दिली जाते. DICGC ही RBI ची उपकंपनी आहे.

तुमच्या Adhaar card वर दुसरं कुणी सिम वापरतंय का? दोन मिनिटात करा चेक

डिपॉझिट इंश्यूरन्स कसा काम करतो?

DICGC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेतील प्रत्येक ठेवीदाराचा बँकेचा परवाना रद्द केल्याच्या तारखेला किंवा विलीनीकरणाच्या किंवा पुनर्बांधणीच्या दिवशी त्याच्याकडे असलेल्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेसाठी कमाल 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवला जातो. याचा अर्थ असा की एकाच बँकेत तुमच्या सर्व खात्यांमध्ये कितीही पैसे जमा केले तरी तुम्हाला फक्त 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. या रकमेत मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम दोन्ही समाविष्ट आहे. बँकेच्या अपयशामध्ये, जर तुमची मूळ रक्कम 5 लाख रुपये असेल, तर तुम्हाला ही रक्कम परत मिळेल आणि कोणतेही व्याज मिळणार नाही.

First published:
top videos

    Tags: Money, Rbi, बँक