मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेतीचे काम आवरून 4 जण दुचाकीवरून चालले होते घरी, कारच्या धडकेत सर्वांचा मृत्यू

शेतीचे काम आवरून 4 जण दुचाकीवरून चालले होते घरी, कारच्या धडकेत सर्वांचा मृत्यू

या अपघातात मोटरसायकलवरील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई, वडील, भाऊ, बहीण यांचा समावेश आहे.

नाशिक, 19 नोव्हेंबर : देवळा-नाशिक मार्गावर (Deola  Nashik road) कार आणि मोटरसायकलची (car accident) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.  या अपघातात  मोटरसायकलवरील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई, वडील, भाऊ, बहीण यांचा समावेश आहे. एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळा-नाशिक मार्गावर असलेल्या दुर्गा हॉटेलजवळ संध्याकाळी ही घटना घडली आहे. रामेश्वर येथील हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे सहकुटुंब मोटरसायकलवरुन (एमएच-41, के-5661) ने पिंपळगाव वाखारी येथून शेतीची कामे आटोपून रामेश्वर येथे निघाले होते.  दुर्गा हॉटेलनजीक नाशिककडून देवळ्याकडे येत असलेल्या अर्टिगा कार (एमएच 43, एएल-3009) आणि मोटरसायकल यांच्यात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात स्पेंलडर या दुचाकीचे दोन तुकडे झाले. कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.

2024 मध्ये चार्जर नसलेले स्मार्टफोन येणार बाजारात? पाहा काय आहे योजना...

या भीषण अपघातात गोपीनाथ साळूबा हिरे (वय 43) यांच्यासह पत्नी मंगलाबाई गोपिनाथ हिरे (35), मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (16), मुलगी जागृती गोपीनाथ हिरे (18) यांचा मृत्यू झाला. तर अपघातात जागृती गंभीर जखमी होती. तिला मालेगाव येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला.

ट्रान्सजेंडर मॉडेलने हिजाब घातला म्हणून मोठा वाद; शेवटी कायमचा सोडला देश

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देवळा पोलिसांत या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अपघातात संपूर्ण कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published: