Home /News /maharashtra /

Sangli: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत झाला घात; कालव्याशेजारी आढळला मृतदेह

Sangli: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत झाला घात; कालव्याशेजारी आढळला मृतदेह

Murder in Sangli: सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील वासुबे गावात एका महिलेची निर्घृण हत्या (Woman brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरफळ कालव्याशेजारी महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

    तासगाव, 30 नोव्हेंबर: सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव येथील वासुबे गावात एका महिलेची निर्घृण हत्या (Woman brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरफळ कालव्याशेजारी महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या (Murder in immoral relationship) झाली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात (Accused take in custody) घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. संबंधित 31 वर्षीय मृत महिला तासगाव येथील गणपती मंदिराच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत राहत होती. मृत महिला मूळची वासुबे येथील रहिवासी असून तिचं लग्न आष्टा येथील तरुणासोबत झालं होतं. पण सहा वर्षांपूर्वी मृत महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती तासगाव येथील गणपती मंदिराच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत राहत होती. हेही वाचा-गळ घालून फिरायला नेलं अन् गळ्यावरून फिरवला चाकू; तरुणाला दिला भयंकर मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला सोमवारी दुपारी आपल्या राहत्या घरातून बाहेर गेली होती. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह वासुबे येथील आरफळ कालव्याशेजारी स्थानिक नागरिकांना आढळून आला. या धक्कादायक प्रकार समोर येताच नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत महिलेची गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तिच्या गळ्याभोवती व्रण आढळले आहेत. हेही वाचा-बर्थडेला नेलं अन् पत्नीला केलं मित्रांच्या हवाली, गँगरेपच्या घटनेनं हादरली मुंबई संबंधित महिलेची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीची सध्या कसून चौकशी केली जात आहे. महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. या घटनेचा अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Sangli

    पुढील बातम्या