तिघे एटीएम सेंटरमध्ये घुसले, गॅस कटरने मशीन फोडून 14 लाख रुपये पळवले

तिघे एटीएम सेंटरमध्ये घुसले, गॅस कटरने मशीन फोडून 14 लाख रुपये पळवले

या एटीएममध्ये अजून सात लाख रुपयांची रोकड असल्याचे दिसून आले.

  • Share this:

राजेश भागवत, प्रतिनिधी

जळगाव, 12 जुलै : जळगाव शहरातील शिव कॉलनी उड्डाण पुलाजवळ असणार्‍या स्टेट बँकेच्या शाखेजवळ असणारे एटीएम गॅस कटरने फोडून तब्बल 14 लाख रूपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. याच्या बाहेर एक एटीएम सेंटर आहे. आज सकाळी हे एटीएम सेंटर तोडले असल्याचे या परिसरातील रहिवाशाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती शाखा व्यवस्थापक दिवेश चौधरी यांना दिली. त्यांनी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून आता तपास सुरू करण्यात आला आहे.

धारावी कोरोनामुक्त करण्यात संघानेही काम केले,चंद्रकांत पाटलांचीही श्रेयवादात उडी

प्राथमिक तपासणीमध्ये संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी 14 लाख 41 हजार रुपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या एटीएममध्ये अजून सात लाख रुपयांची रोकड असल्याचे दिसून आले.

या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळी भेट दिली असून जिल्हा पेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बँकेतील सीसीटीव्हीची पाहणी केली असता यात 3 चोरटे असल्याचे निष्पन्न झाले असून आता याच दिशेने पोलिसांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

राजभवनावर कोरोना, मग आता तरी UGC ला पटेल का? उदय सामंत यांचा थेट सवाल

लॉकडाउन सुरू असतांना पहिल्यांदा काही दिवस गुन्हेगार निवांत होते. मात्र, अलीकडच्या काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आढळून आले असून आता चक्क एटीएम फोडल्याने पोलीस यंत्रणे समोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे.

Published by: sachin Salve
First published: July 12, 2020, 1:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या