धारावी कोरोनामुक्त करण्यात संघानेही काम केले, चंद्रकांत पाटलांचीही श्रेयवादात उडी

धारावी कोरोनामुक्त करण्यात संघानेही काम केले, चंद्रकांत पाटलांचीही श्रेयवादात उडी

'धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घराघरात जाऊन स्क्रिनिंग केले होते'

  • Share this:

कोल्हापूर, 12 जुलै : देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. परंतु, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीने कोरोनावर मात केली आहे. धारावीने कोरोनावर मात केल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांच्या पाठोपाठ आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावी कोरोनामुक्त करण्यात संघाने काम केले असून श्रेय सरकारने घेऊ नये, असं वक्तव्य केलं आहे.

कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 'मुंबईतील धारावी कोरोनामुक्त झाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहे, त्याचे कौतुक झाले पाहिजे. पण,  धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घराघरात जाऊन स्क्रिनिंग केलं. कुणाला ताप आहे, कुणाला श्वसनाचा त्रास आहे, याची तपासणी केली. मुंबई पालिकेनंही काम केले असं नाही. पण सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही', असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोरोनाची लस अंतिम टप्प्यात! 'हा' देश करणार तब्बल 20 कोटी व्हॅक्सिनचे उत्पादन

कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला आहे, असा गंभीर आरोपही पाटील यांनी केला. 'ज्या गोष्टी कौतुकास्पद आहे. त्याचे आम्ही कौतुक करतोच. पण हसन मुश्रीफ म्हणाले की, सहा महिन्यात विकासाची काम इतकी झाली असून देवेंद्र फडणवीस यांचे डोळे विस्फारून जातील असं म्हटलं आहे.  पण, महाविकास आघाडीने कोरोनाबाधितांचा मृतदेहासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक कव्हरमध्ये घोटाळा करण्यात आला आहे. शिवभोजन थाळी 5 रुपयांना देण्यात आली पण कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांना थाली तिनशे रुपयांने देण्यात आली. कोरोना संपल्यावर विधान परिषदेत मुद्दा मांडणार आहे' असंही पाटील म्हणाले.

राजभवनावर कोरोना, मग आता तरी UGC ला पटेल का? उदय सामंत यांचा थेट सवाल

तसंच, 'पंतप्रधान मोदी यांनी ग्रामपंचायतींना निधी जावा अशी 14 वा वित्त आयोग स्थापन केला होता. आता काही ग्रामपंचायतींचे पैसे उरले आहे. ते एफडीमध्ये ठेवण्यात आले आहे. ते पैसे गावासाठी वापरावे असा सरकारचा जीआर आहे. पण, राज्य सरकारने एक पत्रक प्रसिद्ध करून गावातील एफडीची रक्कम सरकारकडे परत केली आहे. पण, असं करता येत नाही. केंद्राने गावासाठी दिलेले पैसे हे गावासाठीच वापरावे लागतील, याबद्दल केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर, 'दैनिक सामनामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा अजून एक भाग प्रसिद्ध होण्याचा बाकी आहे. आज दुसऱ्या भागात अनेक विषयावर ते बोलले आहे. तिसरा भाग एकदा का प्रसिद्ध झाली की, मग त्यावर  सविस्तर बोलता येईल' अशी प्रतिक्रियाही पाटील यांनी दिली.

Published by: sachin Salve
First published: July 12, 2020, 12:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading