मुंबई, 12 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम परीक्षा घेण्यावरून वाद निर्माण झाला होता. राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. आता राजभवनात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. त्यामुळे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिंता व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे. उदय सामंत यांनी ट्वीट करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. ‘राजभवनात कोरोना पोहोचला आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहोचू शकला. आता तरी HRD आणि UGC ला पटेल का? की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे’, असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थितीत केला आहे.
राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???
— Uday Samant (@samant_uday) July 12, 2020
तसंच, ‘कोरोनाची ही परिस्थिती पाहता आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?’ असा थेट सवाल उदय सामंत यांनी उपस्थितीत केला आहे. राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण, त्यांच्या या निर्णयाला भाजपने विरोध केला होता. एवढंच नाहीतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर यूजीसीने विद्यापीठांना अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. यूजीसीच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का बसला होता. परंतु, उदय सामंत यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्दच असणार, असं स्पष्ट केलं.
त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत 55 जणांचे अहवाल हाती आहे. यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस रुग्णसेवेबद्दल खोटं बोलले, डॉक्टर-परिचारिकांनी केला तीव्र निषेध यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप 45 लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाला नाही. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाउन राहत आहे.