मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हृदयद्रावक! मंजूर कर्ज देण्यास 3 वर्षे टाळाटाळ; हवालदिल शेतकऱ्याने बँकेबाहेरच केला भयावह शेवट

हृदयद्रावक! मंजूर कर्ज देण्यास 3 वर्षे टाळाटाळ; हवालदिल शेतकऱ्याने बँकेबाहेरच केला भयावह शेवट

Farmer Suicide in Nanded: मंजूर झालेलं कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यानं नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे.

Farmer Suicide in Nanded: मंजूर झालेलं कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यानं नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे.

Farmer Suicide in Nanded: मंजूर झालेलं कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यानं नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नांदेड, 09 नोव्हेंबर: गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सातत्याने अस्मानी संकटाला सामोरं जावं लागत आहे. कधी पावसाअभावी पिकं करपून जात आहेत, तर कधी अतिवृष्टीमुळे पिकं सडत आहेत. अस्मानी संकटापुढे हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. असं असताना प्रशासनाच्या चाल-ढकल वृत्तीमुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. मंजूर झालेलं कर्ज देण्यास टाळाटाळ (delay in give sanctioning loan) केल्यानं नांदेड (Nanded) जिल्ह्यातील नायगाव येथील एका शेतकऱ्यांने आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे.

आनंदा रोडे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नावं असून ते मूळचे देगाव येथील रहिवासी आहेत. पण सध्या ते  नायगाव नगर पंचायतीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नी सुशीलाबाई यांच्या नावावर 2018 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून 5 लाख रुपयांचं कर्ज मंजूर झालं होतं. किराणा दुकानासाठी हे कर्ज मंजूर करण्यात आलं होतं. तसेच त्याबाबतच पत्र देऊन 15 दिवसात कार्यवाही करण्याचे आदेश तत्कालीन बँक व्यवस्थापकांना दिलं होतं. त्यानुसार मृत आनंदा रोडे यांनी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला.

हेही वाचा-पती गळफास घेत होता अन् पत्नी राहिली बघतच; नागपुरातील विचित्र घटना

पण त्यांनी आज नाही, नंतर या असं सांगितलं. तसेच कुटुंबातील इतर लोकांच्या नावे असलेल्या कर्जासाठी 30 हजार रुपयांचा भरणा करण्यास सांगितलं. त्यामुळे रोडे यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन बँकेत भरणा केला. पण बँकेकडून काही कर्ज मिळालं नाही. दुसरीकडे, खाजगी सावकाराच्या कर्जावर व्याजही वाढत होतं. गेल्या तीन वर्षांपासून सतत बँकेत फेऱ्या मारून देखील त्यांना मंजूर झालेलं कर्ज मिळालं नाही.

हेही वाचा-पुणे: पती रुग्णालयात असल्याचं कळताच साधला डाव; विवाहितेला गोठ्यात डांबून गॅंगरेप

दरम्यान, बँक अधिकाऱ्यांनी घरी येऊन तपासणी केली जाईल, असं सांगितलं. पण बँकेचा एकही कर्मचारी त्यांच्या घराकडे फिरकला नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या आनंदा रोडे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नायगाव शाखेच्या बाहेरील खिडकीला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. संबंधित घटना 6 नोव्हेंबर रोजी शनिवारी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. एका पादचाऱ्याने रोडे यांचा खिडकीला लटकलेला मृतदेह पाहिल्यानंतर, ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Nanded, Suicide