जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच तिरडीवरुन उठून गप्पा मारू लागला 'मृत तरुण', अकोल्यातील घटनेनं खळबळ

अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच तिरडीवरुन उठून गप्पा मारू लागला 'मृत तरुण', अकोल्यातील घटनेनं खळबळ

अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच तिरडीवरुन उठून गप्पा मारू लागला 'मृत तरुण', अकोल्यातील घटनेनं खळबळ

अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या विवरा गावातील प्रशांत मेसरे या 25 वर्षीय तरूणाचा संध्याकाळी मृत्यू झाला होता. मात्र, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेत असतानाच तो चक्क उठून बसल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अकोला 27 ऑक्टोबर : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर मोठं दुःख कोसळतं. भरलेल्या डोळ्यांनी या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करून तिला शेवटचा निरोप दिला जातो. हा क्षण कोणासाठीही अतिशय भावुक करणारा असतो. मात्र, आता अकोला जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे, जी थक्क करणारी आहे. या घटनेत अंत्यसंस्कारावेळी असं काही घडलं की उपस्थित सगळेच थक्क झाले. जंगलात आढळले तब्बल 40 माकडांचे मृतदेह, या पूर्वीही घडल्या होत्या अशा घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या विवरा गावातील प्रशांत मेसरे या 25 वर्षीय तरूणाचा संध्याकाळी मृत्यू झाला होता. मात्र, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेत असतानाच तो चक्क उठून बसल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो फक्त उठूनच बसला नाही, तर गप्पाही मारू लागला. सध्या त्याला गावातल्या एका मंदिरात ठेवण्यात आलं असून तो बोलत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. गावात घडलेल्या या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. यानंतर या तरूणाला पाहण्यासाठी सध्या गावात मोठी गर्दी झाली आहे. गावात सध्या पोलीस पोहोचले आहेत. काही लोक याला दैवी चमत्कार असल्याचं सांगत आहेत. प्रशांत हा होमगार्डमध्ये असून त्याच्या अंगात येत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. कार पार्किंगच्या वादात गेला माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा जीव; हाणामारीत मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत मेसरे हा तरूण मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र, अंत्यसंस्कारासाठी नेत असताना हा तरूण तिरडीवरच उठून बसल्याने सगळेच थक्क झाले. प्रशांतकडे दैवी शक्ती असल्यामुळे तो मृत्यूनंतरही उठून बसल्याच्या चर्चा सध्या गावात सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात