अहमदनगर, 12 डिसेंबर : अहमदनगर (ahamadnagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका तरुण विवाहित महिलेला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह (dead body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या या प्रकरणी महिलेचा पती (husband arrested) आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. वर्षभरापूर्वीच या तरुणीचे लग्न झाले होते. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा अतुल मोरे (वय २२, राहणार अरणगाव दुमाला श्रीगोंदा) असं मृत तरुणीचे नाव आहे. पूजाचा अर्धनग्न मृतदेह राहत्या घरात फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पती अतुल बाळासाहेब मोरे (वय२७) सासरा बाळासाहेब त्रिंबक मोरे(वय५२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील रहिवासी असलेल्या पूजाचे गावातीलच अतुल बाळासाहेब मोरे याच्याशी 19 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाले होते. लग्नाला वर्ष पूर्ण होत नाही तेच पती अतुल मोरे याने पूजाकडे माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावून धरला. कार घेण्यासाठी दीड लाख रुपये आणण्यासाठी पूजाकडे मागणी करत होता. त्यामुळे सासु,सासरे,आणि नंनद या तिघाकडून पूजाचा सासरी दररोज मानसिक व शारीरिक छळ होत होता. हा त्रास मयत पुजा माहेरी आईवडील व पती अतुल यांना तोंडी व मोबाईल मेसेज करुन सांगितला होता.
महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी! राहुल गांधींची भाजपवर टीका
दोन दिवसांआधी पूजाचे वडील संजय दिवटे यांनी गावातील काही पंच म्हणून मध्यस्थी लोकांना घेऊन सासरच्या लोकांना समजूत काढली होती. आर्थिक परिस्थितीत नाजूक असल्यामुळे पैसे देऊ शकणार नाही. शेतात पिक आल्यावर पैसे देण्याचा प्रयत्न करतो, अशी विनंती दिवटे यांनी केली होती.
पूजाच्या वडिलांनी विनंती करून सुद्धा त्रास काही थांबला नाही. सासरी पूजाचा छळ सुरूच होता. अचानक 8 डिसेंबर रोजी घरात पूजाचा मृतदेह आढळून आला. फॅनला गळफास घेऊन पूजाने आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पूजाचा भाऊ संदीप दिवटे आणि चुलत्यांनी घरी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
चार महिन्यांपासून पगार नाही, अनेकांना वाचवणाऱ्या योद्ध्यांवर उपासमारीची वेळ
दुसऱ्या दिवशी पूजावर माहेरच्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, पूजाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सासरीची लोक हजर नव्हती. त्यामुळे पूजाच्या माहेरच्या लोकांना संशय बळावला. त्यांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर बेलवंडी पोलिसांनी पती अतुल मोरे व सासरे बाळासाहेब मोरे, सासु वैशाली बाळासाहेब मोरे, ननंद मोहिणी मधूकर ढोले यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अतुल मोरे आणि सासरा बाळासाहेब मोरे याला अटक केली आहे.
माझी मुलगी आत्महत्या करणारी नाही. तिला सासरच्या लोकांनी छळ करुण मारले व नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडून तिचा मृतदेह फासावर अर्धनग्न अवस्थेत लटकविला आहे, असा आरोप भाऊ संदिप दिवटे यांनी केला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलिस करित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.