मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /केविलवाणा विरोधाभास, आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात कोविड योद्धे हक्काच्या पगारापासून उपेक्षित

केविलवाणा विरोधाभास, आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात कोविड योद्धे हक्काच्या पगारापासून उपेक्षित

जालन्यात कोविड लॅबमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह डेटा ऑपरेटर्सना चार महिन्यांपासून पगार नाही. या कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेटी घेऊन आपली व्यथा मांडली. पण अद्यापही त्यांना पगार मिळालेला नाही.

जालन्यात कोविड लॅबमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह डेटा ऑपरेटर्सना चार महिन्यांपासून पगार नाही. या कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेटी घेऊन आपली व्यथा मांडली. पण अद्यापही त्यांना पगार मिळालेला नाही.

जालन्यात कोविड लॅबमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह डेटा ऑपरेटर्सना चार महिन्यांपासून पगार नाही. या कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेटी घेऊन आपली व्यथा मांडली. पण अद्यापही त्यांना पगार मिळालेला नाही.

पुढे वाचा ...

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 12 डिसेंबर : राज्यात सध्या कोरोनाचं संकट (Corona Pandemic) ओसरलं आहे. पण कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूने धाकधूक वाढवली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येईल की काय? अशी भीती अनेकांना सतावते आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तरी प्रशासन आणि सरकार सज्ज आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले आहेत. पण राजेश टोपे यांच्या जालना (Jalna) जिल्ह्यातूनच विरोधाभासाची घटना समोर आली आहे. कोरोना संकट काळात ज्या योद्ध्यांनी (Covid Worrier) आपल्या जिवाची पर्वा केली नाही. हजारो कोरोनाबाधितांची सेवा केली. रुग्णांच्या हजारो कुटुंबांना आधार दिला. त्याच योद्ध्यांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. या योद्ध्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दर आठवड्यात हक्काची एक सुट्टी देखील मिळणं कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचीदेखील भेट घेतली. पण त्यांच्या प्रश्न, मनातल्या यातना, त्रास अद्यापही संपलेला नाही.

प्रशासनाकडून क्वार्टर्स खाली करण्याचे तोंडी आदेश

जालन्यात कोविड लॅबमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह डेटा ऑपरेटर्सना चार महिन्यांपासून पगार नाही. प्रशासनाच्या विनंतीवरुन संकट काळात नियुक्तीपत्र न घेताच त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली होती. पण तरीदेखील या कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आणि अवहेलना पडताना दिसत आहे. या कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने उपासमारीची नामुष्की ओढावली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने कोविड लॅब कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे कामाचा ताण आणखी वाढला आहे. या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वाटर्स नाही. प्रशासनाकडून जॉईनिंग ऑर्डर देण्यात न आल्याने त्यांना आता थेट क्वार्टर्स खाली करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : विदर्भात Omicron ची एंट्री, नागपूरमध्ये पहिला रुग्ण आढळला

आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली

या पीडित कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री टोपे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकून टोपेंनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची कानउघडणी करत तात्काळ पगार करण्याचे दिले होते आदेश. पण आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली देण्यात आली. कर्मचाऱ्यांचा अद्यापही पगार झालेला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी वर्गामध्ये नाराजीचं वातावरण आहे.

महाराष्ट्रात ओमायक्रोनबाधितांची संख्या 18 वर

दुसरीकडे महाराष्ट्रात ओमायक्रोनबाधितांची संख्या आता 18 वर पोहोचली आहे. यापैकी काही रुग्ण ठणठणीतही झाल्याची माहिती समोर आली आहे. पण मुंबई, पुणे पाठोपाठ नागपुरातही या ओमायक्रोनने शिरकाव केला आहे. आफ्रिकेतून प्रवास करुन नागपूरमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोनची बाधा झाली आहे. नागपूर महापालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी याबाबत माहिती दिलीय. पण या रुग्णाच्या कुटुंबातील इतरांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दोन दिवसांपूर्वी राज्यात 7 नवीन रुग्ण आढळले होते. मुंबईमध्ये ३ रुग्ण आढळले तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 रुग्णांची संख्या वाढली. मुंबईतील तिन्ही रुग्ण हे परदेशातून आलेले होते. या 7 रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाची लस घेतलेली होती. तर एका व्यक्तीने एकच कोरोनाचा डोस घेतला होता. धक्कादायक म्हणजे, या सात जणांमध्ये एका 3.5 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या सातही जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

First published:
top videos