मराठी बातम्या /बातम्या /देश /

महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी! महागाईविरोधी आंदोलनात राहुल गांधींची भाजपवर टीका

महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी! महागाईविरोधी आंदोलनात राहुल गांधींची भाजपवर टीका

महात्मा गांधी हिंदू होते, तर नथुराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

महात्मा गांधी हिंदू होते, तर नथुराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

महात्मा गांधी हिंदू होते, तर नथुराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 12 डिसेंबर: हिंदू आणि हिंदुत्ववादी (Difference between Hindu and Hinduism) यातील फरक (Difference) समजून घेणं गरजेचं असून महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हिंदू (Hindu) होते, तर गोडसे (Nathuram Godse) हिंदुत्ववादी होता, असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं आहे. ते दिल्लीमध्ये आयोजित महागाई हटाओ रॅलीत बोलत होते. हिदू आणि हिंदुत्ववादी या दोन वेगवेगळ्या संकल्पना असून खरा हिंदू हा सत्याग्रही असतो, तर हिंदुत्ववादी हा सत्ताग्रही असतो, असं म्हणत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. हिंदू आणि हिंदुत्ववादी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात फरक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. हिंदू हा नेहमी सत्याचा शोध घेत असतो. त्यामुळेच तो सत्याग्रही असतो. तर हिंदुत्ववादी हा नेहमी सत्तेला हपापलेला असतो आणि त्यामुळे तो सत्ताग्रही असतो. महात्मा गांधींनी लिहिलेल्या सत्याचे प्रयोग या आत्मचरित्राचा संदर्भ देत त्यांनी नथुराम गोडसेवर टीका केली. महात्मा गांधींनी सत्याचा शोध घेण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं. गांधी हे हिंदू होते, तर त्यांची हत्या करणारा नथुराम हा हिंदुत्ववादी होता, असं ते म्हणाले. हे वाचा - दक्षिण भारतात पुन्हा पावसाचं सावट; पुण्यात गारठा वाढला, तापमानाचा पारा 12 अंशावर हा आहे फरक हिंदू हा सत्यापासून कधीच ढळत नसल्यामुळे तो निर्भय़ असतो, असं राहुल गांधी म्हणाले. प्रत्येक संकटाचा आणि भितीचा तो सामना करतो आणि कधीच पळून जात नाही. मात्र हिंदुत्ववाद हा तिरस्काराच्या पायावर उभा असल्यामुळे तो सतत असुरक्षित असल्याची टीका त्यांनी केली. सततची भिती, त्यातून येणारी असुरक्षितता आणि तिरस्कार हे हिंदुत्ववादी असल्याचं लक्षण असल्याचं ते म्हणाले. हिंदूंचं राज्य येऊ द्या 2014 पासून देशात हिंदूंचं राज्य नव्हे, तर हिंदुत्ववाद्यांचं राज्य असल्याचं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. यानंतर हिंदुत्ववाद्यांना हरवून पुन्हा एकदा हिंदूंचं राज्य आणूया, असं आवाहन त्यांनी केलं. सर्व धर्मांचां आदर राखणारा, सर्वांवर प्रेम करणारा आणि सत्याचा शोध घेणारा व्यक्तीच खरा हिंदू असल्याचं ते म्हणाले.
First published:

Tags: BJP, Hindu, Mahatma gandhi, Rahul Gandhi (Politician)

पुढील बातम्या