जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune: व्याजाच्या पैशांसाठी महिलेचा छळ; बंदुकीचा धाक दाखवत सावकाराकडून अनेकदा बलात्कार

Pune: व्याजाच्या पैशांसाठी महिलेचा छळ; बंदुकीचा धाक दाखवत सावकाराकडून अनेकदा बलात्कार

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Rape in Pune: व्याजानं घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात पुण्यातील (Pune) एका 26 वर्षीय महिलेवर खाजगी सावकारनं अनेकदा बलात्कार (moneylender raped woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी, 10 ऑगस्ट: व्याजानं घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात पुण्यातील (Pune) एका 26 वर्षीय महिलेवर खाजगी सावकारनं अनेकदा बलात्कार (moneylender raped woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील पाच महिन्यांपासून आरोपी सावकारानं पीडित महिलेवर मावळ, दिल्ली, पठाणकोठ, अमृतसर, सुरत अशा विविध ठिकाणी नेवून बलात्कार केला आहे. तसेच पीडित महिलेचं मोबाइलमध्ये अश्लील चित्रीकरण (Obscene video) देखील केलं आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. किरण रंभाजी घारे (वय 40, रा. बेबडओहळ, ता. मावळ), दीपक प्रकाशचंद्र ओसवाल (वय 46, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पीडित महिला ही ओसवाल याच्या ओळखीची होती. त्यानेच घारे याच्याशी पीडितेशी ओळख करून दिली होती. दरम्यान पीडितेनं घारे याच्याकडून एक लाख रुपये व्याजानं घेतले होते. काही दिवसांनी पीडितेनं 50 हजार रुपयांचे दोन चेक आरोपी घारेला दिले. पण आरोपीनं व्याजाच्या पैशासाठी पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. हेही वाचा- SUV कार दिली नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार पण पीडित महिलेनं लैंगिक संबंधासाठी नकार दिला असता, आरोपीनं महिलेच्या पतीला आणि मुलाला धमकी देत, बंदुकीचा धाक दाखवत पीडितेला चारचाकी गाडीत बसवलं. यानंतर आरोपीनं पीडितेला दिल्ली, पठाणकोट, अमृतसर आणि सुरत अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान आरोपीनं मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ब्लॅकमेल करत पीडितेवर वारंवार बलात्कार केला. तसेच माझ्याविरोधात कुठेही तक्रार केली तरी माझी कुणी वाकडं करू शकत नाही, अशी धमकीही आरोपीनं दिली. आरोपीनं मार्च ते ऑगस्ट पर्यंत पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. हेही वाचा- गच्चीवर झोपलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, चपलेमुळे झाला खुनाचा उलगडा आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी ओसवाल याला घारे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याचं माहीत असूनही त्यानं घारे हा चांगला माणूस असल्याची ओळख करून दिली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune , Rape
  • First Published :
जाहिरात
जाहिरात