गोंदिया, 10 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी मुंबई (Mumabi) येथील नालासोपारा परिसरातील खाजगी रुग्णालयात एका वरिष्ठ डॉक्टरनं आपल्यासोबत काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग केला होता. ही घटना ताजी असताना आता गोंदियात (Gondia) उपचार घेण्यासाठी आलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा विनयभंग (Doctor molest young woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीनं डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथील आहे. 24 वर्षीय पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत कट्टीपार येथील एका रुग्णालयात उपचारासाठी आली होती. दरम्यान आरोपी डॉक्टरनं उपचार करण्याच्या बहाण्यानं पीडित तरुणीशी अश्लील स्पर्श केले आहेत. या संतापजनक घटनेनंतर पीडित तरुणीनं आमगाव पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित डॉक्टर विरोधात फिर्याद दाखल केली आहे. आमगाव पोलिसांनी विनयभंगासह अन्य कमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉ. हरीणखेडे असं आरोपी डॉक्टरचं नाव असल्याची माहिती समोर आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा- Rape Case: कुस्ती कोचचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जीवे मारण्याचीही दिली धमकी
नालासोपाऱ्यात नर्ससोबत डॉक्टरचं घृणास्पद कृत्य
दुसरीकडे, मुंबईनजीक असणाऱ्या नालासोपाऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या 21 वर्षीय नर्सचा त्याच रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरकडून विनयभंग करण्यात आला होता. आरोपीनं पीडित नर्सचा विनयभंग केल्यानंतर घटनेची वाच्यता कुठेही न करण्याची धमकी दिली होती. पण पीडितेनं आरोपी डॉक्टरच्या धमकीला बळी न पडता नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
हेही वाचा- पुणे हादरलं! 5 मित्रांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; 2 वर्षांपासून देत होते नरक यातना
तुलिंज पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात विनयभंगासह धमकी देण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी डॉक्टर फरार झाला होता. डॉ. सुशील मिश्रा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. आरोपी डॉक्टर नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन युपी नाका परिसरातील आरती रुग्णालयात कार्यरत होता. आरती हॉस्पिटलमध्ये आरोपी डॉक्टर पार्टनरशिपमध्ये असून या रुग्णालयाच्या मॅनेजमेंटचं काम पाहत असायचा. या घटनेचा तपास सुरू आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.