Home /News /maharashtra /

हृदयद्रावक! हातावर पोट असणाऱ्या दाम्पत्यानं गमावलं पोटचं लेकरू, दोन वेळच्या अन्नासाठी झगडताना झाला मृत्यू

हृदयद्रावक! हातावर पोट असणाऱ्या दाम्पत्यानं गमावलं पोटचं लेकरू, दोन वेळच्या अन्नासाठी झगडताना झाला मृत्यू

(Photo- shutter stock)

(Photo- shutter stock)

Accident in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या नशिराबाद येथील खेडी शिवारात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका मजूर दाम्पत्याच्या दोन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

    जळगाव, 15 जानेवारी: जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या नशिराबाद येथील खेडी शिवारात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका मजूर दाम्पत्याच्या दोन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत (2 year old minor girl death) झाला आहे. संबंधित दाम्पत्या रेल्वेशेजारी खडी टाकण्याचं काम करीत असताना त्यांची दोन वर्षाची चिमुकली खेळता-खेळता रेल्वे रुळाजवळ गेली होती. यावेळी समोरून आलेल्या एका भरघाव ट्रेननं तिला जोरदार धडक (Train accident) मारली आहे. या घटनेत चिमुकली गंभीररित्या जखमी होऊन तिचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना घडताच आक्रोश करणाऱ्या कुटुंबानं तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत. दिव्या आपसिंग डावर असं मृत पावलेल्या 2 वर्षीय बालिकेचं नाव आहे. चिमुकलीच्या अपघातानंतर डावर दाम्पत्याने घटनास्थळी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीला आणलं नाकीनऊ, Instaवरील तरुणाचा कांड वाचून हादराल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालिकेचे वडील आपसिंग डावर हे मूळचे मध्य प्रदेशातील भिकनगाव येथील रहिवासी आहेत. ते मजुरीकाम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. घटनेच्या दिवशी गुरुवारी (13 जानेवारी) डावर कुटुंबीय नाशिराबाद तालुक्यातील खेडी शिवारातील रेल्वे रुळाजवळ खडी टाकायचं काम करत होते. दरम्यान त्यांची दोन वर्षांची मुलगी दिव्या त्यांच्या आसपासच खेळत होती. हेही वाचा-आजीसोबत देवदर्शनासाठी जाणाऱ्या चिमुकल्याचा वाटेतच संपला प्रवास, तडफडून मृत्यू दरम्यान डावर दाम्पत्य कामात व्यस्त असताना, त्यांची मुलगी खेळत खेळ रेल्वे रुळावर गेली. यावेळी समोर आलेल्या एका भरधाव रेल्वेनं तिला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भयावह होता की चिमुकली घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. ही घटना घडताच डावर दाम्पत्यानं टाहो फोडला. त्यांनी तातडीने चिमुकलीला नशिराबाद येथील रुग्णालयात दाखल केलं. पण येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती दिव्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Crime news, Jalgaon

    पुढील बातम्या