Home /News /aurangabad /

औरंगाबाद: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला आणलं नाकीनऊ, Instaवरील मित्राचा कांड वाचून हादराल

औरंगाबाद: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला आणलं नाकीनऊ, Instaवरील मित्राचा कांड वाचून हादराल

Crime in Aurangabad: इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणानं (Instagram friend) अल्पवयीन मुलीला (Minor girl molestation) नाकीनऊ आणलं आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    औरंगाबाद, 14 जानेवारी: इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणानं (Instagram friend) अल्पवयीन मुलीला (Minor girl molestation) नाकीनऊ आणलं आहे. आरोपी तरुणानं तिचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं हा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाच्या (POCSO) विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. करण भाऊसाहेब जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या 19 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहेत. तो वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील रहिवासी आहे. तर पीडित मुलगी शहरातील एका शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण याचा एक मित्र पीडित अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी राहतो. त्याचं अनेकदा आपल्या मित्राकडे येणं-जाणं सुरू होतं. याचवेळी त्याची नजर पीडित मुलीवर पडली. हेही वाचा-आजीसोबत देवदर्शनासाठी जाणाऱ्या चिमुकल्याचा वाटेतच संपला प्रवास, तडफडून मृत्यू यानंतर त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडितेशी ओळख वाढवली. तिला भेटण्यासाठी तो वारंवार प्रयत्न करू लागला. त्यासाठी त्याने पीडितेचा पाठलाग करायला सुरुवात केली. पण मुलीला त्याला भेटण्याची इच्छा नसल्याने तिने त्याला भेटण्यास नकार दिला. तरीही त्याचा त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे ते संबंधित प्रकार आपल्या आईला आणि काकांना सांगितला. यानंतर काकांनी करणला आणि त्याच्या वडिलांना बोलावून समजावून सांगितलं. हेही वाचा-पुण्यातील बड्या बिल्डरला अजितदादांच्या पीएच्या नावानं धमकीचा फोन, मागितले 20 लाख तरीही करणची खोड मोडली नाही. त्याने पीडितेच्या घरासमोरून चकरा मारणं सुरूच ठेवलं. दरम्यान बुधवारी सकाळी पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपीनं पुन्हा तिचा पाठलाग केला. अखेर घाबरलेल्या मुलीने सायंकाळी घरी येताच घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीनं आई वडीलांसोबत थेट पोलीस ठाण्यात जाऊन करण जाधव याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news

    पुढील बातम्या