Home /News /news /

आजीसोबत देवदर्शनासाठी जाणाऱ्या चिमुकल्याचा वाटेतच संपला प्रवास, स्टिअरिंग लॉक झाल्याने तडफडून मृत्यू

आजीसोबत देवदर्शनासाठी जाणाऱ्या चिमुकल्याचा वाटेतच संपला प्रवास, स्टिअरिंग लॉक झाल्याने तडफडून मृत्यू

फोटो- दिव्य मराठी

फोटो- दिव्य मराठी

Road Accident in Beed: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एकादशीनिमित्त आजीसोबत देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकल्यावर काळानं घाला घातला आहे.

    गेवराई, 14 जानेवारी: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एकादशीनिमित्त आजीसोबत देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकल्यावर काळानं घाला घातला आहे. देवदर्शनासाठी जात असताना, चार वर्षीय चिमुकल्याला एका भरधाव ट्रॅक्टरने चिरडलं आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की, आजीच्या डोळ्यादेखत चिमुकल्याने तडफडून प्राण सोडला आहे. या दुर्दैवी घटनेत मृत चिमुकल्याची आजीदेखील जखमी झाली आहे. या प्रकरणी मादळमोही पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्यात येत आहे. माऊली अनिरुद्ध चव्हाण असं मृत पावलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. तर सुमनबाई जालिंदर चव्हाण असं जखमी झालेल्या आजीचं नाव आहे. दोघंही गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी 13 जानेवारी रोजी नातू आणि आजी गावातील संत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान मंदिरात देव दर्शनासाठी जात होते. दरम्यान वंजारवाडी येथील मिनी ट्रॅक्टरचालकाने चिमुकल्याला चिरडलं आहे. हेही वाचा-खोकल्याचं औषध घेऊन झोपी गेलं दाम्पत्य; काही तासात महिलेचा मृत्यू, गावात खळबळ या घटनेची माहिती मिळताच मादळमोही पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघातग्रस्त ट्रॅक्टर जप्त केला आहे. ट्रॅक्टरचा मालक आणि आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हेही वाचा-पुण्यात अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचं पाऊल,Suicide Note मधून धक्कादायक माहिती उघड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मादळमोही जवळील वंजारवाडी येथील रहिवासी असणाऱ्या एक तरुणाने अलीकडेच एक नवीन ट्रॅक्टर घेतला होता. संबंधित तरुण आपला ट्रॅक्टर घेऊन मादळमोही येथील कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरून जात होता. याचवेळी त्यानं चार वर्षीय माऊलीला चिरडलं आहे. ट्रॅक्टरचं स्टिअरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे. गुरुवारी दुपारी गावातील स्मशानभूमीत चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास मादळमोही पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Beed

    पुढील बातम्या