मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /2 वर्षांच्या मुलाला आईने फेकलं विहिरीत, जीव जाईपर्यंत तिथेच होती उभी! लातूरमधील घटना

2 वर्षांच्या मुलाला आईने फेकलं विहिरीत, जीव जाईपर्यंत तिथेच होती उभी! लातूरमधील घटना


मन हेलावून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगावजवळील राठोडा गावात घडली.

मन हेलावून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगावजवळील राठोडा गावात घडली.

मन हेलावून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगावजवळील राठोडा गावात घडली.

लातूर, 07 डिसेंबर : आई आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम करते. आपल्या लेकराला कुठे काही कमी पडू नये म्हणून जीवाचे रान करते. पण लातूरमध्ये (latur) एका आईने (mother) आपल्या 2 वर्षांच्या मुलाला विहिरीत (well) फेकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली. धक्कादायक म्हणजे, विहिरीत मुलाला फेकल्यानंतर जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत ती विहिरीजवळच उभी होती.

मन हेलावून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगावजवळील राठोडा गावात घडली.  माया व्यंकट पांचाळ (वय 25) असं या निर्दयी मातेचं नाव आहे. या महिलेला संपत पांचाळ नावाचा दोन वर्षांचा मुलगा होता. या महिलेचा पती व्यंकट पांचाळ हे लातूरमध्ये एका खासगी कंपनीमध्ये वॉचमॅन म्हणून नोकरी करत आहेत.

नेहमी प्रमाणे व्यंकट पांचाळ कामावरून घरी आले. त्यांनी आपल्या मुलाबद्दल विचारणा केली असता आरोपी मायाने काहीच सांगितले नाही. मुलगा कुठे दिसत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मायाकडे विचारणा केली असता, मी त्याला विहिरीत फेकून दिलं असं उत्तर दिलं. आधी या महिलेच्या सांगण्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. पण,  लोकांनी घराशेजारीच असलेल्या शिंदे यांच्या विहिरीकडे धाव घेतली आणि डोकावून पाहिले असता मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहताच वडील व्यंकट पांचाळ यांनी एकच आक्रोश केला.

कर्जासह जीवनातील अन्य समस्या सुटण्यासाठी `हे` व्रत ठरेल फलदायी

आरोपी माया आणि व्यंकट यांचा संपत नावाचा हा एकुलता एक मुलगा होता.  माया आणि व्यंकट यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये आठ दिवसांपूर्वीच कडाक्याचं भांडण झालं होतं. सतत होणाऱ्या भांडणाचा राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे.

जॉब मिळताच तरुणीने रस्त्यावर असं काही की CCTV VIDEO पाहून बॉसनेही जोडले हात

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पतीच्या फिर्यादीवरून निर्दयी माता मायाला अटक करण्यात आली आहे. तिनेही गुन्ह्याची कबुली दिली.  तिच्याविरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:
top videos

    Tags: Latur