मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कर्जासह जीवनातील अन्य समस्या सुटण्यासाठी `हे` व्रत ठरेल फलदायी

कर्जासह जीवनातील अन्य समस्या सुटण्यासाठी `हे` व्रत ठरेल फलदायी

आजच (7 डिसेंबर) हा योग होता. यापुढील अंगारक योग 5 एप्रिल 2022 रोजी असेल.

आजच (7 डिसेंबर) हा योग होता. यापुढील अंगारक योग 5 एप्रिल 2022 रोजी असेल.

आजच (7 डिसेंबर) हा योग होता. यापुढील अंगारक योग 5 एप्रिल 2022 रोजी असेल.

दिल्ली, 7 डिसेंबर: आजकाल अनेक लोक कर्ज (Loan) किंवा अन्य कौटुंबिक समस्यांनी (Family Issues) त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. कौटुंबिक, आर्थिक, आरोग्यविषयक समस्या कमी व्हाव्यात, सुख-समृध्दी यावी यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेत असतो. परंतु, परिश्रम घेऊनही काही वेळा समस्या कमी होताना दिसत नाहीत. जीवनातील समस्यांचं निराकऱण व्हावं, यासाठी काही लोक अध्यात्मिक, ज्योतिष शास्त्राकडे वळतात. व्रत-वैकल्यांच्या माध्यमातून समस्या कमी व्हाव्यात अशी यामागील भूमिका असते. हिंदू धर्मात श्री गणपती (Shri Ganapati) हे सर्वांचं आराध्य दैवत आहे. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला पारंपारिक पध्दतीनं श्री गणेश पूजन केलं जातं. परंतु, संकष्टी चतुर्थीप्रमाणेच प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) देखील असते. ही चतुर्थी मंगळवारी आल्यास अंगारक योग होतो. अंगारकी संकष्टी चतुर्थीप्रमाणेच या चतुर्थीला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री गणेशाचं व्रत, आराधना केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते, असं म्हटलं जातं. याबाबतची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे.

श्री गणपतीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक महिन्यातील विनायक चतुर्थीला व्रत केलं जातं. विनायक चतुर्थी मंगळवारी आल्यास अंगारक योग होतो. आज (7 डिसेंबर) हा योग आहे. यापुढील अंगारक योग 5 एप्रिल 2022 रोजी असेल. 2022 मध्ये हा योग एकदाच येणार आहे.

Weight Loss: रात्रीचं जेवण 'या' वेळी केलं तर होईल वजन कमी, वाचा वेटलॉसचा फंडा

चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती पूजन केलं जातं. शिव पुराणानुसार, शुक्ल पक्षातील चतुर्थीला दुपारी श्री गणेशाचा जन्म झाला होता. श्री गणपतीच्या जन्मामुळे जग मंगलमय झालं. त्यामुळे भगवान ब्रम्हाने चतुर्थीचं व्रत विशेष फलदायी असल्याचं सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी अंगारकी चतुर्थी व्रत (Angaraki Chaturthi) महत्त्वाचं मानलं गेलं आहे. यादिवशी श्री गणपतीचं पूजन केलं असता सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळू शकते.

विनायक चतुर्थीच्या दिवशी हळदीपासून (Turmeric) श्री गणेश मूर्ती तयार करावी. या मूर्तीची पूजा करून ती घरात ठेवावी. यामुळे घरात सुख-समाधान राहतं. तसेच कुटुंबियांचे आपापसात संबंध चांगले राहतात. याशिवाय विनायक चतुर्थीच्या दिवशी गायीच्या शेणापासून श्री गणपतीची मूर्ती तयार करून तिची विधीवत पूजा करावी. त्यानंतर ही मूर्ती घरात ठेवावी. यामुळे घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं.

सूर्याचं राशीपरिवर्तन होणार पुढच्या आठवड्यात; `या` 4 राशींच्या व्यक्तींनी सावध र

ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रह (Mars) हा सेनापती मानला जातो. तो मेष (Arise) आणि वृश्चिक (Scorpion) राशीचा स्वामी आहे. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला श्री गणेश पूजन करावं. तसेच मंगळ ग्रहाला लाल फूल अर्पण करावं. शिवलिंग स्वरुपात देखील मंगळाची पूजा केली जाते. शिवलिंग स्वरुपातील मंगळास पाण्यात शेंदूर मिसळून ते पाणी अर्पण करावं. त्यानंतर शिवलिंगावर शिजवलेले तांदूळ वहावे. पूजनावेळी ओम अं अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

अंगारक विनायक चतुर्थीला हे व्रत केल्यास जीवनातील सर्व समस्या सुटण्यास मदत होते, असं सांगितलं जातं.

(Disclaimer: ही माहिती सामान्यपणे उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे. या लेखात दिलेल्या उपायांचं News18lokmat समर्थन करतंच असं नाही. )

First published: