वॉशिंग्टन, 07 डिसेंबर : भरपूर मेहनतीनंतर आपल्याला चांगली नोकरी (Job) लागली की साहजिकच त्याचा आनंद होतो. हा आनंद आपण साजराही करतो. आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते. पण एका तरुणीने जॉब मिळताच अशा पद्धतीने आपला उत्साह व्यक्त केला आहे की ते पाहून तिला जॉब देणारा बॉसही थक्क झाला आहे (Woman reaction after getting job). जॉब मिळाल्यानंतर तरुणीने रस्त्यावर येत असं काही केलं की बॉसलाही आश्चर्य वाटलं. आपल्याला कुणीच पाहत नाही असं या तरुणीला वाटलं पण तिने जे काही केलं ते सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आणि ते सर्व तिच्या बॉसने पाहिलं. त्यानंतर बॉसने स्वतःच हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल (Viral video) होतो आहे (Woman dance on road after getting job).
व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी आधी फुटपथावरून चालत येताना दिसते. त्यानंतर ती आपल्या डाव्या हाताकडे रस्त्यावर वळते. तिच्या शेजारी दोन गाड्याही पार्क केलेल्या आहेत. या दोन्ही गाड्यांच्या मध्ये ती आधी उभी राहते. आजूबाजूला पाहते आणि चक्क डान्स करू लागते. आपल्या आजूबाजूला कुणी नाही ना हे ती पाहते खरं. पण रोडवरील तिसऱ्या डोळ्याची म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर मात्र तिच्यावर होती. इथं सर्वकाही रेकॉर्ड झालं. हे वाचा - ‘मम्मी… उतार दो…’, Paragliding चा हा नवा मजेशीर VIDEO तुम्ही पाहिलात का? हा व्हिडीओ जॉर्जियातील असल्याचं सांगितलं जातं आहे. डकारा स्पेन्स नावाच्या इन्स्टाग्राम युझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या तरुणीला मी आताच नोकरीवर ठेवलं आणि तिची प्रतिक्रिया अशी होती. सोबतच डकारा यांनी हात जोडल्याचा इमोजीही टाकला आहे. आपल्याला नोकरी लागली याचा तिला इतका आनंद झाला की स्वतःवर कंट्रोल करू शकली नाही. पाहतात पाहता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अगदी या व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणीपर्यंत हा पोहोचला. कलाया असं या तरुणीचं नाव आहे. तिनेही हा व्हिडीओ पाहून त्यावर आपल्या @Kalaxxyy_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. हे वाचा - VIDEO - स्टाईल कसली साधं तोंडही दाखवू शकत नाही; जीममध्ये तरुणीसमोर तरुणाची फजिती कलाया म्हणाली, मी बऱ्याच वेळा अशा हरकती करते. पण यावेळी कॅमेऱ्यात हे सर्व रेकॉर्ड होईल हे मला माहिती नव्हतं. मला असं करायचं होतं. मला असं करताना कुणी पाहिलं नसेल असं मला वाटलं. पण मी चुकीचे होते. मला वाटलं नव्हतं की माझा डान्स इतका व्हायरल होईल आणि लोक मला ओळखू लागतील. या व्हिडीओसाठी धन्यवाद.