• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • औरंगाबाद हादरलं, शेतवस्तीवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी 2 महिलांवर केला सामूहिक बलात्कार

औरंगाबाद हादरलं, शेतवस्तीवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी 2 महिलांवर केला सामूहिक बलात्कार

घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला.

घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला.

घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला.

  • Share this:
औरंगाबाद, 20 ऑक्टोबर :  औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री पैठण (paithan) तालुक्यातील तोंडीळी गावात दरोडेखोरांनी (Robber) चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला केला. त्यावेळी या नराधमांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात ही घटना घडली आहे.  मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला चढवला होता. मात्र, या वेळी या ठिकाणी असलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटनासमोर आली आहे. Volvo XC60 SUV आणि S90 सेडान भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स सुरुवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा दाख दाखवण्यात आला. त्यांनतर  त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला. दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे,  यातील एक पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे. भारतातील कोविड-19 लसीकरण मोहिमेतील लैंगिक फरक भरून काढणे घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली असून दरोडेखोरांचा शोध घेत आहे.
Published by:sachin Salve
First published: